आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यात एकाच दिवशी लाच घेताना 3 जण अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे/ जळगाव  - धुळ्यात एकाच दिवशी लाच मागणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना पकडण्यात अाले. पहिल्या घटनेत १५ हजार रुपयांची लाच मागणारे  नायब तहसीलदार हरीश बजरंग गुरव अाणि लिपिक प्रदीप शरद देवरे सापडला. तर दुसऱ्या घटनेत वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी तीन हजाराची लाच मागणारा हिरे वैद्यकीय काॅलेजमधील वरिष्ठ लिपिक हरिचंद्र फुलपगारे सापडला. 
 
जुनवणे शिवारात तक्रारदाराची जमीन अाहे. ही जमीन बिनशेती करण्यासाठी नायब तहसीलदार गुरव यांनी लिपिक प्रदीप देवरे यांच्या मार्फत लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत फिर्याद दिली होती. त्यानुसार लाच घेताना त्यांना अटक करण्यात  आली. धुळ्यात वैद्यकीय महाविद्यालयाचा वरिष्ठ लिपिक हरिचंद्र शालिग्राम फुलपगारे याला अटक करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...