आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : अजिंठा चौफुलीवरील 35 वर्षांपासूनचे अतिक्रमण हटवले; सुशाेभिकरणाचा अडथळा झाला दूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा चौफुलीवरील अतिक्रमण काढताना रस्त्यात येणारी झाडे जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आली. त्याचबरोबर कोपऱ्यावर असलेल्या मंदिराची संरक्षक भिंत तोडण्यात आली. रात्री मंदिरही काढण्यात आले. - Divya Marathi
अजिंठा चौफुलीवरील अतिक्रमण काढताना रस्त्यात येणारी झाडे जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आली. त्याचबरोबर कोपऱ्यावर असलेल्या मंदिराची संरक्षक भिंत तोडण्यात आली. रात्री मंदिरही काढण्यात आले.
जळगाव - गेल्या बऱ्याच दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या अजिंठा चाैफुलीच्या सुशाेभिकरणाच्या कामाचा मुहूर्त बुधवारी सापडला. गेल्या ३५ वर्षांपासूनचे अतिक्रमण हटवण्यासाठी पालिका, पाेलिस महामार्ग प्राधिकरणातर्फे संयुक्त माेहीम राबवण्यात अाली. चाैकातील डाव्या बाजूवरील अतिक्रमणचे मार्किंग करून त्यावर जेसीबी चालवत अतिक्रमण भुईसपाट केले. 
 
अजिंठा चाैफुलीवरील अतिक्रमणामुळे हाेणारी काेंडी तसेच प्रदूषणामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत हाेता. बाहेरगावाहून जळगावात येणाऱ्या नागरिकांचे हाेणारे स्वागत अत्यंत वाईट पद्धतीने हाेत असल्याची बाब लक्षात घेऊन ‘दिव्य मराठी’ने या चाैकाचे सुशाेभिकरणासाठी पाठपुरावा सुरू ठेवला हाेता. मध्यंतरी महापाैरांसह पाेलिस पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या चाैकाची पाहणी करून नियाेजन देखील केले हाेते. गेल्या दीड वर्षापासून चाैकाचे लाेकसहभागातून विस्तारीकरण सुशाेभिकरण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू हाेत्या. या सर्व घडामाेडींना गेल्या पंधरा दिवसांत वेग अाला. जिल्हाधिकारी तथा प्रभारी अायुक्त किशाेर राजेनिंबाळकर महापाैर नितीन लढ्ढा यांनी अामदार सुरेश भाेळे पाेलिस अधीक्षक दत्तात्रय कराळेे यांना साेबत घेत बुधवारी वाजता चाैकाच्या सुशाेभिकरणाच्या कामात येणारे अडथळे दूर केले. 

मंदिर परिसरातील अतिक्रमण काढले : अामदार सुरेश भाेळे यांचे सासरे सुरेश खडके हे संस्थापक असलेल्या श्रीकृष्ण मंदिराच्या परिसरातील अतिक्रमण काढण्यात अाले. अामदार भाेळे यांच्या हस्ते मंदिरात श्रीफळ फाेडून तसेच पूजा करून अतिक्रमण काढण्याचे काम सुरू झाले आहे. महापाैर प्रभारी अायुक्तांनी संयुक्तरित्या अामदार भाेळेंचा सत्कार केला. रात्री वाजता मूर्तीची पूजा करून स्थलांतरीत करण्याची प्रक्रीया केली. दरम्यान अतिक्रमण कारवाईत मंदिराच्या परिसरातील १०० फूट लांब ४० फूट रूंद जागेवरील संरक्षण भिंत जमीनदाेस्त करण्यात अाली. तसेच चाैकात दाेन्ही बाजूने अाखणी करून काॅर्नरसाठी जागा निश्चित केली आहे. त्याचबरोबर पार्किंग करण्याच्या सूचना दिल्या. 
 
शहरासाठी जागा देणार 
शहराचा एन्ट्री पाॅइंट असलेल्या अजिंठा चाैकाचे सुशाेभिकरण करण्यात येणार अाहे. रस्ता रुंदीकरणासाेबत वाहतुकीची समस्याही सुटणार अाहे. त्यामुळे अाम्ही सातपुडा अाॅटाेमाेबाइलची काही जागा काॅर्नरसाठी देण्यास तयार अाहाेत. प्रशासनाकडून अाखणी झाल्यानंतर त्या ठिकाणचे साहित्य काढून घेतले जाईल.
किरण बच्छाव, व्यावसायिक 
 
पालिका, पाेलिसांचे शक्तिप्रदर्शन 
कारवाई करताना ३५ वर्षांपूर्वी उभारण्यात अालेल्या मंदिराचे स्थलांतर करावे लागणार असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये म्हणून प्रशासनाने काळजी घेतली हाेती. या वेळी शहर एमअायडीसी पाेलिस ठाण्याचे १०० कर्मचारी लक्ष ठेवून हाेते. अधीक्षक कराळेे, उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे यांच्या नेतृत्वात पाेलिस निरीक्षकही पूर्ण वेळ थांबून हाेते. मनपा प्रभारी अायुक्त राजेनिंबाळकर, महापाैर लढ्ढा, उपमहापाैर ललित काेल्हे, शहर अभियंता सुनील खडके, सर्व शाखा अभियंता, अतिक्रमणचे पथक तीन जेसीबी ४० ट्रॅक्टर ट्रॅक्टरसह उपस्थित हाेते. यावेळी काँग्रेसचे कार्याध्यक्ष डाॅ.राधेश्याम चाैधरींच्या सूचनांची दखल घेत कारवाई केली. 
 
जिल्हाधिकारी, महापौरांनी घात केला 
महामार्ग रुंदीकरण करताना केवळ मंदिराची संरक्षक भिंत पाडण्याचा विषय ठरला हाेता; परंतु अाम्ही गेल्यानंतर जिल्हाधिकारी महापाैरांनी त्या ठिकाणचे मंदिर पाडून टाकले. वास्तविक नवीन जागेचा शाेध घेऊन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे नियाेजन केले हाेते. परंतु रात्री अचानक मंदिर पाडून संपूर्ण जागा माेकळी करण्यात अाली. दाेघांनी मिळून अामचा विश्वासघात केला. सुरेश भाेळे, अामदार 
 
पुढील स्लाइडवर वाचा अाज देणार डिझाइन, १४ झाडांची कत्तल आणि ‘दिव्य मराठी’च्या पाठपुराव्याला यश... 
बातम्या आणखी आहेत...