आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सादरे अात्महत्या प्रकरण : दुसऱ्या दिवशी वाळू ठेकेदार मिश्राची 4 तास चाैकशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव/ नाशिक- निलंबित पोलिस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्याप्रकरणी मंगळवारी नाशिक येथे सीअायडीने वाळू ठेकेदार राजेंद्र मिश्रा यांची सुमारे चार तास कसून चौकशी केली. सोमवारी वाळू ठेकेदार रवींद्र चौधरी याची तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली हाेती. बुधवारी मनसेचे नगरसेवक ललित कोल्हे यांची सीआयडी चौकशी करणार अाहे.

सादरे आत्महत्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. या तपासाबाबत महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी तपास प्रगतिपथावर असल्याचे सांगितले होते. मंगळवारी सीआयडीने समन्स बजावलेले वाळू ठेकेदार राजेंद्र मिश्रा यांची सीआयडी कार्यालयात चार तास चौकशी झाली. बुधवारी नगरसेवक ललित कोल्हे यांची चौकशी करण्यात येणार आहे.

सागर चौधरी आणि राजेंद्र चौधरी समव्यावसायिक आहेत. त्यांचे मैत्रीचे संबंध असल्याचे तपासात पुढे आले आहे. अधीक्षक प्रदीप देशपांडे, उपअधीक्षक के.डी.पाटील यांनी जबाब नोंदवून घेतले आहेत. याप्रकरणी आणखी काही व्यावसायिकांसह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.