जळगाव - पुढील तीन दिवसांत उष्णतेची लाट अधिक तीव्र हाेणार असून तापमानाचा पारा ४३ अंशांपुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली अाहे. दिवसभर उष्णतेच्या झळामुळे हैराण झालेल्या जळगावकरांना रात्री उशिरापर्यंत उष्ण वाऱ्याचा सामना करावा लागणार अाहे. साेमवारी पारा ४१.५ अंशावर हाेता.
गेल्या पंधरवड्यात दाेन वेळा ढगाळ वातावरण अाणि अवकाळी पावसाच्या अागमनानंतर तीन वेळा पारा ४३ अंशापुढे गेला हाेता. सध्या ४१.५ अंशावर असलेला पारा मंगळवार, बुधवार अाणि गुरुवारी ४३ अंशापुढे जाऊ शकताे. अल निनाेच्या प्रभावामुळे अाणि कमी पर्जन्यमानामुळे देशभरात यावर्षी उन्हाळा अधिक तीव्र राहिल. तापमान सरासरीपेक्षा ते अंशाने अधिक राहिल, असा अंदाज यापूर्वीच वर्तवण्यात अालेला अाहे. दरम्यान, राज्यात सर्वाधिक हाॅट सिटी म्हणून अाेळख असलेल्या जळगाव शहर अाणि जिल्ह्यात मार्च महिन्यापासूनच उन्हाच्या असह्य झळांनी नागरिकांना हैराण केले अाहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात देखील ३८ ते ३९ अंशापर्यंत तापमान स्थिर हाेते. यावर्षी मात्र मार्च महिन्यातच पारा ४० अंशावर गेला अाहे. तर एप्रिलमध्ये ४३ अंशापुढे तापमान गेले अाहे. येत्या तीन दिवसांत यात अाणखी वाढ हाेणार असल्याने नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार अाहे.
असे हाेते शहरांचे तापमान
चंद्रपूर४५ अंश, जळगाव ४२.०५, नांदेड ४४.०५, उस्मानाबाद ४२.०८, परभणी ४३.०८, अकाेला ४२.०२, ब्रह्मपुरी ४४.०२, मालेगाव ४२.०८, वर्धा ४४.०१ , यवतमाळ ४३.००, अमरावती ४१.०४, साेलापूर ४२.०५ नागपूर ४४.०२.
उष्माघाताचीशक्यता
अागामी तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार अाहे. त्यामुळे उष्माघाताची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे अावाहन महापालिका सिव्हिलतर्फे करण्यात अाले अाहे.
राज्यभरात तडाखा
गेल्याअाठवड्यात ४० अंशांवर स्थिरावलेल्या पाऱ्याने साेमवारी राज्यभरात ४२ अंशांची पातळी अाेलांडली. त्यामुळे राज्यात उष्णतेची लाट पसरली अाहे. खान्देश, विदर्भ मराठवाड्यात उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवला. विदर्भात चंद्रपूरला साेमवारी ४५ अंश तापमान नाेंदवले गेले. ही या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नाेंद अाहे.