आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्‍ट्रीय तपास संस्थेतर्फे वाँटेड अतिरेक्यांवर बक्षीस जाहीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - हैदराबाद येथील राष्‍ट्रीय तपास संस्थेतर्फे एका गुन्ह्यात फरार असलेल्या तीन आरोपींविषयी माहिती देणा-यांना बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. यापैकी अब्दुल सुभान कुरेशी ऊर्फ अब्दुल सुभान उस्मान कुरेशी ऊर्फ खासीम ऊर्फ झाकीर तौकीर जुबेर कुरेशी याच्यावर चार लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तसेच वासीक बिल्ला ऊर्फ रमजान मोहतीसीन याच्यावर दोन व अलीम जेब आफ्रिदी मासुकर अहेमद आफ्रिदी याच्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.


आरोपी आढळल्यास 09493799350 (एनआयए, हैदराबाद), 09493799336 (एनआयए, कोची), 0484-2349344 (कंट्रोल रूम, कोची) व 040-27764488 (कंट्रोल रूम, हैदराबाद) या क्रमांकांवर संपर्क साधावा.