आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंदूर विमानतळावर आता सुसज्ज 'नाइट लँडिंग' सुविधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर गोंदूर विमानतळ असून, या ठिकाणी रात्री विमान उतरण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे थेट शिरपूर येथे जावे लागत होते. या ठिकाणी बॉम्बे फ्लाइंग क्लबतर्फे वैमानिकांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याने आता विमानतळावर रात्री विमान उतरवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरचे शहर हीच धुळ्याची महत्त्वाची ओळख आहे; परंतु या महामार्गाचा शहराच्या विकासाला म्हणावा तसा फायदा झाला नाही. काही वर्षांपूर्वी गोंदूर येथे विमानतळ उभारण्यात आले. त्यामुळे शहरात िवमाने उतरण्याची सुविधा उपलब्ध झाली; परंतु या ठिकाणी केवळ लहान विमाने उतरवता येणे शक्य आहे. विमानतळाचा व्यावसायिक तत्त्वावर अद्यापही वापर सुरू झालेला नाही. सद्य:स्थितीत या विमानतळाचा उपयोग केवळ मंत्री, खासदारांचे विमान उतरवण्यासाठीच होत आहे. एरवी या विमानतळावर पूर्णपणे शुकशुकाट असतो. महिनोमहिने असेच चित्र हाेते. आता या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून मंंुबई फ्लाइंग क्लबतर्फे शिकाऊ पायलटांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे सकाळी सहा वाजेपासून विमानाचे उड्डाण सुरू होते. पूर्वी केवळ दिवसाच विमान उडू शकत होते. कारण रात्रीच्या वेळेस धावपट्टीवर विमान उतरवण्याची सुविधा नव्हती; परंतु आता रात्रीच्या वेळीही गोंदूर विमानतळावरून विमानाचे उड्डाण होणार असून, विमान उतरवता येणार आहे. त्यासाठी क्लबतर्फे धावपट्टी विकसित झाली असून, विमानतळाचा विकास झाला आहे. इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्ये विमानतळाचा विकास होणार होता. धावपट्टीची लांबी वाढवण्यात येणार होती. मात्र, हे काम रखडले आहे. रात्रीची विमानसेवा शहरवासीयांना महत्त्वाची ठरणार आहे.
दोनशे तास विमान उड्डाणाचा अनुभव
वैमानिक होण्यासाठी लेखी पेपर बरोबर उड्डाणाचा सरावही आवश्यक असतो. त्यासाठी जुहू येथे चार महिने ग्राउंड क्लास करावा लागतो. पायलट होण्यासाठी कमीत कमी २०० तास उड्डाणाचा अनुभव आवश्यक असतो. वैमानिकांना रात्रीच्या वेळेला विमान उडवण्याचा १० तासांचा अनुभव गरजेचा असताे.

चार हजार फुटांवरून होते विमान उड्डाण
प्रशिक्षणार्थी पायलट प्रशिक्षित पायलटच्या देखरेखीखाली विमान उडवतात. ही विमाने चार हजार फूट उंचीवरून उडविली जातात. शहरावरून दुसरे प्रवासी विमान जरी गेले तरी त्या विमानाचा त्रास या विमानांना होण्याची शक्यता कमी आहे. कारण व्यावसायिक विमाने कमीत कमी ३५ हजार फुटांवरून उडतात.

एटीसी टॉवर उभारला
गोंदूर विमानतळावर दिवसभर पायलटांचे प्रशिक्षण सुरू असते. त्यामुळे शहरात दिवसभर विमाने घिरट्या घालताना दिसून येतात. या विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरवण्यासाठी धावपट्टीच्या दोन्ही बाजूला कंंदील लाइट लावण्यात आले आहेत. त्याला गुस नेक म्हणतात. त्याचबरोबर विमान धावपट्टीवर उतरवण्यासह ते हवेत झेपावताना योग्य दिशेने जाते आहे की नाही यासाठी पायलटशी संपर्क साधणे महत्त्वाचे असते. या कामासाठी विमानतळावर एटीसी टॉवर उभारण्यात आला आहे.

सध्या आहेत दोन विमानतळ
जिल्ह्यातआता दोन विमानतळांची सुविधा उपलब्ध झाली आहे. धुळे जवळील गोंदूर विमानतळ हे शासकीय आहे. तर शिरपूर येथे एक खासगी विमानतळही काही वर्षांपूर्वी विकसित झाले अाहे. दरम्यान, हे विमानतळ बॉम्बे फ्लाइंग क्लबने शासनाकडून भाडेकराराने घेतले आहे. या ठिकाणी सात विमाने उपलब्ध असून, त्यात चार आसनी विमानांचा समावेश आहे. दोन इंजीन असलेले एक विमानही या ठिकाणी आहे.
बातम्या आणखी आहेत...