आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nikam Fool Ramesh Jain? Parvatibai Bhil Hold Sandal

निकम साहेब रमेश जैन यांना उल्लू बनवतात, तर अामचे काय? पार्वताबाई भील यांनी उगारली चप्पल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘निकम साहेबांसारखे अधिकारी रमेश जैन, अश्विन सोनवणेंसारख्या उच्चशिक्षितांना उल्लू बनवतात; तर आमच्यासारख्या अशिक्षितांना किती उल्लू बनवत असतील? हे अधिकारी नगरसेवकांना मानपान देत नाहीत. त्यांना सोडायचे नाही; त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे बाेल पहिल्यांदा नगरसेविका झालेल्या पार्वताबाई भील यांनी सभागृहात अायुक्तांना सुनावले अन् सारे सभागृह अवाक् झाले तसेच त्यांना पाठिंबाही दिला.
महानगरपालिकेच्या महासभेत सहायक संचालक चंद्रकांत निकम यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात सभागृहात चर्चा सुरू हाेती अन् संतापलेल्या पार्वताबाई उभ्या राहिल्या. अापले म्हणणे मांडल्यानंतर काही वेळातच त्यांनी निकम यांच्यावर चप्पलही उगारली. सभागृहात निकम यांनी फारसे बोलणे टाळले.
मी माझा खुलासा शासनाकडे पाठवला आहे, असे त्यांनी सांगितले. महासभेत निकमांवर चप्पल उगारल्याची घटना घडल्यानंतर काही वेळानंतर उपायुक्त अविनाश गांगोडे, प्रदीप जगताप, शहर अभियंता सी.जी.पाटील, विशेष लेखापरीक्षक एस.बी.भोर हे जागेवरून उभे राहिले सभागृहातून वॉक आऊट करण्याच्या तयारीत होते. परंतु, महापौर राखी सोनवणेंनी त्यांना खाली बसण्यास सांगितले.

निकम सभागृहातून बाहेर पडले.....
मिलिंदकोंडू सपकाळे यांनीही नगरसेवकांवर आरोप करणा-या अधिका-यांना शिक्षा देण्याची गरज व्यक्त केली. अशा अधिका-यांना आमच्या महिला नगरसेविका कशापद्धतीने धडा शिकवतात? हे बघा, असे म्हणताच पार्वताबाई भील यांनी निकम यांना मारण्यासाठी थेट चप्पल उगारली. या वेळी मनसेच्या सगळ्याच नगरसेविका जागेवर उभ्या राहिल्या. त्यामुळे सभागृहात तणाव निर्माण झाला. हा प्रकार घडताच दीड तास बसून असलेले िनकम यांनी सभागृहातून काढता पाय घेतला.

काय अाहे प्रकरण?
महासभेने केलेल्या निलंबनाच्या ठरावाला शह देण्यासाठी आपल्याच अधिका-यांकडून निवेदन देऊन प्रामाणिकतेचे प्रमाणपत्र निकम यांनी घेतले हाेते. ते अायुक्तांना दिले. मात्र, निवेदनावर सही केलेले अधिकारी उलटल्यानंतर निकमांची बोलती बंद झाली. तसेच नितीन लढ्ढा, कैलास सोनवणे, अनंत जोशी, पृथ्वीराज सोनवणे यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या.

निकम सभागृहातून बाहेर पडले.....
मिलिंदकोंडू सपकाळे यांनीही नगरसेवकांवर आरोप करणा-या अधिका-यांना शिक्षा देण्याची गरज व्यक्त केली. अशा अधिका-यांना आमच्या महिला नगरसेविका कशापद्धतीने धडा शिकवतात? हे बघा, असे म्हणताच पार्वताबाई भील यांनी निकम यांना मारण्यासाठी थेट चप्पल उगारली. या वेळी मनसेच्या सगळ्याच नगरसेविका जागेवर उभ्या राहिल्या. त्यामुळे सभागृहात तणाव निर्माण झाला. हा प्रकार घडताच दीड तास बसून असलेले िनकम यांनी सभागृहातून काढता पाय घेतला.

शासनाकडे मांडणार
निकमयांना तातडीने बडतर्फ करावे, त्यांना पालिकेत पाय ठेवू देऊ नका, त्यांच्या कार्यकाळातील परवानग्यांची चौकशी करण्याची मागणी झाली. परंतु, आजच निकम यांना कार्यमुक्त केल्यास अडचणी येऊ शकतात. तसेच पर्यायी व्यवस्थाही नाही. शासनाच्या नगररचना विभागातही अधिकारी नाहीत. त्यामुळे मे रोजी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांशी चर्चा करून तातडीने व्यवस्था करण्याची विनंती करण्याचे आयुक्त संजय कापडणीस यांनी सांगितले.

...तर अायुक्तांवर अविश्वास ठराव
आयुक्तांनीनिवेदन शासनाकडे पाठवले, याचा अर्थ आयुक्तांचेही सभागृहाबद्दलचे मत वाईट अाहे का? असे नगरसेवकांनी विचारले. अाम्ही निकम यांच्यावर थेट कारवाई करू शकत नाही. पण आयुक्तांवर अविश्वास ठराव आणता येतो, असा सूचक इशाराही या वेळी साेनवणेंनी दिला.