आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमळनेरात दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, कर्मचाऱ्यांची धावपळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आत्मदहनाचा प्रयत्न करताना अनंत निकम. - Divya Marathi
आत्मदहनाचा प्रयत्न करताना अनंत निकम.
अमळनेर- येथील तहसील कार्यालयासमोर दोन लाक्षणिक उपोषणे दोन जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न यामुळे स्वातंत्र्य दिन गाजला. या घटनांमुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अनंत निकम यांच्या आंदोलनास नागरिकांचा मोठा पाठिंबा होता. परिस्थिती चिघळू नये, यासाठी प्रांताधिकारी संजय गायकवाड यांनी तातडीने बैठक बोलावत याप्रश्नी तोडगा काढला. आत्मदहनाच्या प्रयत्नाप्रकरणी अनंत निकम, नगरसेविका नीता भांडारकर यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला. न्यायालयात हजर केले असता दोघांची मुक्तता केली.

निकमयांचे आंदोलन
शहरातभ्रष्ट यंत्रणा, अवैध धंदे, बेकायदा कृत्य, वेश्या व्यवसाय, दारू, सट्टा, जुगार असे विविध अवैध वाढले आहेत. मात्र, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून हद्दपार करण्याचे षड््यंत्र सुरू आहे, असा आरोप अनंत निकम यांनी केला आहे. याप्रकरणी प्रांताधिकारी कार्यालयाच्या समोरील गेटवर अनंत निकम यांनी चढून अंगावर रॉकेल ओतले होते. यानंतर त्यांनी घोषणाबाजी करत स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना खाली उतरवले. याप्रसंगी अग्निशमन दलाच्या पथकाने निकम यांच्या अंगावर पाणी टाकले.

सप्टेंबरपर्यंत माहिती कळवणार
नीता भांडारकर यांना सप्टेंबरपर्यंत परिषदेतील सर्व कागदपत्रांची पाहणी करून त्यांना कळवण्यात येईल. याप्रकरणी प्रांताधिकारी चौकशी अधिकारी असल्याने त्यांना सहकार्य केले जाईल, असे मुख्याधिकारी पी.जी.सोनवणे यांनी सांगितले. मुंबई पोलिस अधिनियमात कायदेशीर तरतुदी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे संबंधितास नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी रमेश पवार यांनी दिले.

भूखंड आरक्षित असताना शॉपिंग
शहरातीलटी.पी फायनल प्लॉट ७७, ७८सह सिटी सर्व्हे नं. ३०३९ जागा ही पालिका रुग्णालय शाळेसाठी आरक्षित आहे. पालिकेने या जागेवर व्यापारी संकुलाचा प्रस्ताव मांडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे स्थगिती आदेश डावलून पालिकेने बेकायदा बांधकामाचा घाट घातला आहे. याविरोधात भाजपचे सरचिटणीस शीतल देशमुख सहकाऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणाआधीच बैठक बोलावण्यात आली. याप्रकरणी प्रांताधिकारी संजय गायकवाड यांच्या दालनात काही पदाधिकारी तक्रारदारांची बैठक झाली. या बाबत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

नगरसेविकेचा आत्मदहनाचा प्रयत्न
आमदारांच्यादबावाखाली प्रशासन अाहे. नगरसेविका म्हणून वारंवार तक्रारी करूनही सभेचे कच्चे प्रोसिडिंग लिहले जात नाही. नकला नगरसेविका या नात्याने अर्ज देऊनही मिळत नाही. याप्रकरणी आत्मदहन करण्याचा इशारा नगरसेविका भांडारकर यांनी दिला होता. त्या बुरखा घालून आल्या. परंतु, त्यांना पोलिसांनी ओळखले आणि महिला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

अवैध धंदे रोखणार
शहरातील सर्व अवैध धंदे कधी बंद होणार? याबाबत अनंत निकम यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार यांना विचारणा करण्यात आली. हे अवैध धंदे लवकरच रोखण्यात येतील, असे आश्वासन पवार यांनी दिले. या वेळी पालिका आणि प्रशासनाविरुद्ध असलेल्या तक्रारींबाबत ऊहापोह झाला. यासंदर्भात चौकशी करून वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्यात येईल, असेही आश्वासन देण्यात अाले. दरम्यान, हे अवैध धंदे त्वरित रोखल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

कृषी मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा
संसदविधिमंडळ सदस्य, मंत्री, त्यांचे सचिवांचे भरमसाट पगार आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या मालाचा भाव कमी केला जातो. महागाई निर्देशांकानुसार शेती मालाचे भाव वाढले पाहिजेत. वयोवृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन मिळावे, या मागण्यांसाठी लाक्षणिक आत्मक्लेश उपोषण करण्यात अाले. या उपोषणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनोहर पाटील, जयवंत शिसोदे, रामलाल पाटील, दीपक पाटील, विकास पाटील, साहेबराव मिस्तरी, मधुकर पाटील, संजय धनगर, संतोष जोगी, अविनाश गरुड आदी सहभागी झाले होते. या वेळी अनेक महत्वांच्या विषयांवर चर्चा झाली.
पुढे पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...