आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निकेशचा अमानुष खून; संशयितास अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- कांचननगर परिसरातील शिवशंकरनगरातील निकेश कमलाकर सोनवणे याच्या खूनप्रकरणी शनिवारी पोलिसांनी संशयित आरोपी क्रमांक 2 ललित प्रकाश कोळी (वय 26) याला अटक केली. त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पैशांच्या देवाण-घेवाणीतून आबा ऊर्फ मुकेश रमेश बाविस्कर, ललित प्रकाश कोळी आणि भय्या उर्फ कृष्णा विक्रम सोनवणे यांनी निकेशला लाकडी दांडा, पट्टा, बूट आणि फायटरने बेदम मारहाण केली होती. उपचार सुरू असताना 21 जून रोजी त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी निकेशच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अटक केलेल्या कोळी याला न्यायाधीश जयदीप पांडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांनी त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. नितीन जगताप यांनी काम पाहिले.

हिंगणघाट येथून अटक
खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी दोन पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. यातील एका पथकाने नांदुर्‍याजवळ असलेल्या हिंगणघाट येथून अटक केली उर्वरित दोघांचा शोध अद्याप सुरू आहे.
आरोपी सराईत गुन्हेगार
कोळी याची पोलिस कोठडी मिळवण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात गुन्ह्याची केसडायरी आणि संशयितांच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादीच सादर केली. यात संशयितांनी गुन्ह्यात वापरलेला लाकडी दांडा, पट्टा, तसेच आरोपींचे कपडे जप्त करणे बाकी आहेत, संशयित क्रमांक 1 आबा बाविस्कर व संशयित 3 कृष्णा सोनवणे हे अद्याप बेपत्ता आहेत, बाविस्कर याच्यावर 13 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे हे संशयित सराईत गुन्हेगार असल्याचा उल्लेखही अहवालात करण्यात आला आहे. संशयित 1 व 3 यांचा शोध घेण्यासाठी अटक झालेल्या कोळी याची मदत होणार आहे. तसेच संशयितांच्या दहशतीमुळे त्यांच्याविरोधात साक्ष देण्यासाठी कोणीही तयार होत नाही. त्यांनी निकेशला अत्यंत अमानुष मारहाण केली असल्याचा अहवाल पोलिसांनी सादर केला आहे.