आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांचा पाऊस पाडणाऱ्या मांत्रिकाची चौकशी, बालशाैर्य पुरस्कार विजेता नीलेश भिल अपहरण प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्ताईनगर - राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेता नीलेश भिल व त्याचा लहान भाऊ सात दिवसांपासून बेपत्ता आहे. सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा थांगपत्ता नाही. त्यामुळे त्याचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात अाहे. या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर, बोदवड पोलिसांनी माळेगाव (ता. मुक्ताईनगर) येथे पैशांचा पाऊस पाडल्याने मध्यंतरी चर्चेत आलेला मांत्रिक आदेशबाबाला बुधवारी (दि. २४) मध्यरात्री चौकशीसाठी ताब्यात घेतले अाहे.
 
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेता नीलेश रेवाराम भिल (वय १२) आणि त्याचा सातवर्षीय भाऊ गणपत हे दोघे १९ मेपासून बेपत्ता आहेत. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल असून चार पोलिस पथकांनी भुसावळ, वरणगाव रेल्वे, बसस्थानक भागात त्यांचा शाेध घेतला.  तसेच श्वानपथकाद्वारे मुक्ताईनगर तालुक्यातील वनक्षेत्रात कसून शोध घेतला. मात्र, नीलेश व गणपतचा सुगावा लागलेला नाही. दरम्यान, याप्रकरणी मुक्ताईनगर व बोदवड पोलिसांनी बुधवारी रात्री माळेगाव (ता. मुक्ताईनगर) येथील आदेशबाबा (वय ४५) या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
 
दरम्यान, माळेगावातील रहिवासी असलेला आदेशबाबा सुमारे आठ ते दहा वर्षांपूर्वी पैशांचा पाऊस पाडल्याच्या दाव्यावरून संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत आला होता. आता नीलेशचे अपहरण प्रकरण गाजत असताना पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने काही धक्कादायक माहिती समोर येते का याकडे सर्वांचे लक्ष आहे. 
बातम्या आणखी आहेत...