आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nill The Loan Within The 15 Days; If Not ,face The Criminal Charges : Special Auditor Give Order To The Credit Society

कर्ज 15 दिवसांत भरा; अन्यथा फौजदारी : विशेष लेखापरीक्षक यांची पतसंस्‍थांना आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - चंद्रकांत बढे पतसंस्थेच्या 10 मोठय़ा कर्जदारांसह 300 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 15 दिवसांत कर्ज भरा; अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल होतील, असे विशेष लेखापरीक्षक एम.डी.पाटील यांनी बजावले आहे.
बढे पतसंस्थेच्या 19 शाखांमधून वितरित करण्यात आलेले 149 कोटी 927 लाख रुपये कर्ज येणे आहे. हे कर्ज वसूल झाल्यास 138 कोटी रुपयांच्या ठेवी परत करता येणे शक्य होणार आहे. नोटीस दिलेल्यांमध्ये 10 मोठय़ा ग्रुपचा समावेश आहे. या ग्रुपच्या माध्यमातून 78.69 कोटी रुपयांचे कर्ज थकित आहेत. या कर्जदारांनी कर्ज उचल करताना कर्जास पुरेसे तारण दिलेले नाही. कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही, नमूद करारात कर्जाची परतफेड केलेली नाही.

या कर्जदारांनी वेळेत कर्ज भरल्यास ठेवीदारांना ठेवी परत करणे शक्य असल्याचा अहवाल त्यांनी लेखापरीक्षणात दिला आहे. सहकार आयुक्तांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येणार आहे. यापूर्वी 2007 ते 2009 च्या दरम्यान झालेल्या लेखापरीक्षणात दोषी आढळल्याने संचालक मंडळाविरोधात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे आहेत टॉपटेन कर्जदार
खाचणे ग्रुप- 15.27 कोटी, परतणे ग्रुप- 4.1 कोटी, रामराव पाटील ग्रुप- 34.82 कोटी, महाजन ग्रुप-4.8 कोटी, खडके ग्रुप-3.10 कोटी, आलव्ही ग्रुप-4.4. कोटी, ढाके ग्रुप- 4.4. कोटी, मांडवगणे ग्रुप- 1.57 कोटी, ठाकूर ग्रुप- 3.70 कोटी.
बढेंची सीआयडी चौकशी
चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेच्या सांगवी शाखेत केलेल्या घोटाळ्याप्रकरणी चेअरमन चंद्रकांत बढे यांची सोमवारी सीआयडी चौकशी झाली. सीआयडी कार्यालयात उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गायकवाड यांनी त्यांचा लेखी जबाब नोंदवून घेतला. या प्रकरणात चौकशीसाठी बढे यांच्यासह संचालकांना नोटीस देऊन चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बढे यांच्यासह त्यांचे संचालक सोमवारी हजर झाले.