आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nine And 11th Standard Syllabus Change In Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नववी, अकरावीच्या अभ्यासक्रमात बदल;सीबीएसईनच्या धर्तीवर फेरबदल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नव्या शैक्षणिक वर्षापासून नववी आणि अकरावीच्या अभ्यासक्रमात अंशत: बदल करण्यात आला आहे. नवीन अभ्यासक्रम सीबीएसई पॅटर्नच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके 15 जूनपर्यंत बाजारात दाखल होतील.
शिक्षण मंडळातर्फे 2012-13 या वर्षापासून नववी व अकरावी आणि 2013-14 पासून दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची नुकतीच पुण्यात बैठक झाली. पर्यावरणासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये नववीच्या विज्ञान विषयात पर्यावरण व ग्लोबल वॉर्मिंग संदर्भातील दोन प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त गणित आणि भूमिती या विषयाच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी हे दोन्ही विषय 75 गुणांचे होते. ते आता प्रत्येकी 50 गुणांचे करण्यात आले आहेत. नववीसाठी या वर्षापासून माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. हा विषय 50 गुणांसाठी असेल. या विषयात संगणक तसेच तंत्रज्ञानासंदर्भातील माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. नवीन विषयाचा पेपर न घेता शाळेकडून गुणदान पद्धतीने विद्यार्थ्यांना गुणांकन देण्यात येणार आहे.या बदला मुळे विद्यार्थ्यांना जास्त अभ्यास करावा लागणार आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचा बौध्दीक दर्जा सुधारेल. विज्ञान विषयात झालेल्या बदलामुळे विद्यार्थ्यामध्ये पर्यावरणा संदर्भात आवड निर्माण होईल