आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे: चाेरलेल्या नऊ माेबाइलसह दुचाकी हस्तगत; चाैघांना घेतले ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - गेल्या काही दिवसांपासून दुचाकीवर येऊन रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तींचे माेबाइल चाेरून नेण्याचे प्रकार वाढले हाेते. चाेरट्यांचा तपास लावण्यासाठी पाेलिसांकडून शहरात गस्त वाढवण्यात अाली. गस्त घालताना कारवाई करीत पाेलिसांनी चाैघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चाेरलेले नऊ माेबाइल एक दुचाकी असा दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. चाेरट्यांनी माेबाइल चाेरीची कबुली दिली अाहे. 
 
शहर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना शहरात दुपारसह रात्रीची गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या हाेत्या. शाेध पथकातील कर्मचारी शहरात विविध भागात गस्त घालत हाेते. या पथकातील कर्मचाऱ्यांना मिळालेल्या माहितीवरून काही जण माेटारसायकलवर येऊन माेबाइल हिसकावणार असल्याची माहिती मिळाली. पाेलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एन.एस. अाखाडे, सहायक उपनिरीक्षक हिरालाल बैरागी यांच्या नेतृत्वाखाली पथकातील कर्मचाऱ्यांनी चिताेड राेडवरील श्रीरामनगर येथे सापळा रचला. त्या ठिकाणाहून अाकाश उर्फ समाधान पवार, गाैरव साेमनाथ शेणगे, ऋतिक धर्मा साेनवणे (रा. श्रीराम नगर) अाणि गिरीश रवींद्र पाटील (रा. साेन्या मारुती काॅलनी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चाैकशी केली असता त्यांनी स्नेहनगर अाणि अग्रवाल विश्रामभवन येथे माेबाइल चाेरी केल्याची कबुली केली. अधिक चाैकशीत त्यांनी नऊ विविध कंपनीचे माेबाइल, एक यामाहा एफझेड माेटारसायकल (क्र.एमएच १८-एजी ८६९९) ही काढून दिली. त्यांची किंमत एक लाख ४५ हजार ९९७ रुपये अाहे. 

ही कारवाई पाेलिस अधीक्षक एम.रामकुमार, अप्पर पाेलिस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय अधिकारी हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शाेध पथकातील उपनिरीक्षक नाना अाखाडे, सहायक उपनिरीक्षक हिरालाल बैरागी, हेडकाॅन्स्टेबल मिलिंद साेनवणे, जगदीश खैरनार, किरण जगताप, काॅन्स्टेबल याेगेश चव्हाण, दिनेश शिंदे, मुख्तार मन्सुरी, महेश जाधव, संजय जाधव, संदीप पाटील, पंकज खैरमाेडे, अखलाक पठाण, दीपक दामाेदर, राहुल पाटील यांनी केली. 
बातम्या आणखी आहेत...