आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nine Sales Tax Deputy Commissioner Appointed In Jalgaon

जिल्ह्यात 9 विक्रीकर उपायुक्तांची नियुक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक परीक्षा 2013च्या अंतिम निकालाच्या आधारे 1090 उमेदवारांपैकी 716 जणांना नियुक्ती देण्यात आली आहे. यात जळगाव जिल्ह्यात नऊ प्रशिक्षणार्थी विक्रीकर उपायुक्तपदी नियुक्ती केले आहे.

शासनाने 30 ऑक्टोबर रोजी याबाबत आदेश काढला होता. त्यात नियुक्ती केलेल्या उमेदवारांना महिनाभरात हजर व्हावे लागणार आहे. तसेच नियुक्तीपासून दोन वर्षांचा परिविक्षा कालावधी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात या उमेदवारांची विक्रीकर कार्यालयात नियुक्त करण्यात आली आहे. यात जळगाव येथे प्रशिक्षणार्थी विक्रीकर उपआयुक्तपदी (व्हॅट प्रशासन) बाळकृष्ण फुला खैरनार, जितेंद्र नारायण बाविस्कर, सुरेश एकनाथ चौधरी, राहुल राजधर सोनवणे, नीलेश शांताराम सोनवणे, संदीप देवराम पाटील, योगेश उखडरू पाटील, शशिकांत भगवान राजपूत, ममता सुपडू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.