आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एफडीएने घेतले मिठाई, तेल, तुपाचे नऊ नमुने; जुन्या सरस्वती डेअरीच्या केंद्रांमध्ये तपासणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अन्न अाैषध प्रशासन विभागातर्फे गेल्या दाेन दिवसात दूध, तूप, मिठाई तेलाचे नऊ नमुने घेण्यात अाले अाहेत. जुन्या सरस्वती डेअरीच्या उत्पादन पॅकिंग सेंटर या दाेन्ही ठिकाणाहून नमुने घेण्यात अाले असून या डेअरी विरुद्ध एका महिलेने संबंधित विभागाकडे तक्रार केली अाहे. 
 
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळीची शक्यता गृहित धरून अन्न, अाैषध प्रशासन विभागातर्फे अन्न निरीक्षक संदीप देवरे, दिलीप साेनवणे अनिल गुजर यांच्या पथकाने ही नियमित तपासणी केली. यात दूध, गावरानी तूप, खवा, पेढे, मिठाई, तेल, वनस्पती तूप, रवा अादींचे नऊ नमुने घेण्यात अाले अाहेत. तर जुन्या सरस्वती डेअरीच्या नवीपेठेतील रिटेल काउंटर (पॅकिंग सेंटर) अाणि चिंचोली येथील कारखान्यास अन्न निरीक्षक दिलीप साेनवणे यांच्या पथकाने भेट देऊन एकाच वेळी म्हशीच्या तुपाचे नमुने घेतले अाहेत. या डेअरीतून तूप, मिठाई खव्याचे नमुने यापूर्वीही १० अाॅक्टाेबर राेजी घेतले असल्याचे साेनवणे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. तसेच विविध पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्याची कारवाई पुढे अशीच सुरू राहणार अाहे. यासाठी नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही सोनवणे यांनी सांगितले. 
 
महिलेने केली होती तक्रार 
सरस्वती डेअरीतून १० अाॅक्टाेबरला घेतलेल्या ४०० ग्रॅम तुपाच्या बरणीत पालीची किंवा उंदराची शेपूट असल्याचा संशय असल्याची तक्रार मनीषा पाटील या महिलेने अन्न, अाैषध प्रशासनाकडे केली अाहे. त्यानुसार नमुने घेण्यात अाले अाहे. मात्र, हे नमुने अनाैपचारिक म्हणून घेण्यात अाले असल्याची माहिती अन्न निरीक्षक दिलीप साेनवणे यांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...