आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावात ‘फ्रेंडशिप डे’लाच भेटवस्तू झाल्या खाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- ‘फ्रेंडशिप डे’ला रात्री 10.30 वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटमधील ‘नाइन टू नाइन’ या भेटवस्तूंच्या दुकानास आग लागून सर्व वस्तू खाक झाल्या. परिसरातील नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदतकार्य केले. दुकानाच्या दोन्ही बाजूस असलेल्या शोकेसच्या काचा फोडून आत पाणी मारून अग्निशामक दलाच्या एका बंबाने आग विझविण्यात आली. शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मगन मेहते यांनी घटनास्थळावरील गर्दी नियंत्रणात आणली. या आगीत मोठे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.