आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nirmala Gavit News In Marathi, Nandurbar Lok Sabha Seat, Vijaykumar Gavit

नंदुरबार जिल्हा डॉ. गावितांची खासगी प्रॉपर्टी आहे का? - निर्मला गावित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार - भाऊ समाजवादीचा आमदार, मुलीला खासदारकीचे तिकीट, बायको जिल्हा परिषदेत, भाऊ शहादा विधानसभेत उभे राहण्याच्या तयारीत. नंदुरबार जिल्हा डॉ. विजयकुमार गावित यांची खासगी प्रॉपर्टी आहे का? अशी टीका इगतपुरीच्या आमदार तथा माणिकराव गावित यांच्या कन्या निर्मला गावित यांनी काँग्रेसच्या मेळाव्यात केली.


हिनाहा..याचा अर्थ ‘ही नको’
आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, हिनाहा..याचा अर्थ आदिवासी भाषेत ‘ही नको’ असा होतो. जनता तिला नाकारणार आहेत. हीना गावित ही आमच्या मुलीसारखी आहे. तिच्यावर आम्ही टीका करणार नाहीत. परंतु शरद पवार, अजित पवारांशी गद्दारी करणार्‍या नेत्याला आम्ही सोडणार नाही. पक्षाच्या जीवावर मोठे झालेले नेते स्वार्थासाठी जर पक्ष बदलत असतील तर नंदुरबारची जनता हा निर्णय मान्य करणार नाही.

आमदारकीही काढून टाकावी
काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप नाईक म्हणाले, हीना गावित ऐवजी डॉ. विजयकुमार गावितांनी माणिकराव गावितांच्या विरोधात दंड थोपटून बघावे, तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. राष्ट्रवादीने डॉ. गावितांचे मंत्रिपद काढून टाकले. पक्षातून त्यांना निलंबित केले. यापुढे त्यांची आमदारकीही काढून टाकली पाहिजे, अशी मागणी आम्ही करणार आहोत. दरम्यान, नंदुरबारात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे.


गावित परिवाराची खिल्ली
निर्मला गावित म्हणाल्या, म्हणे बदल हवा आहे. परिवर्तन हवे आहे. असे कोण म्हणतो. ते तरी सांगा? माणिकराव गावितांनी काहीच विकास केला नाही, असे डॉ. गावित टीका करतात. मग माणिकराव हे 9 वेळा निवडून कसे आलेत? नंदुरबार जिल्ह्यातील मतदार काय मूर्ख आहेत ? हीनाला उभे करा, ही म्हणे लोकांची मागणी आहे. नंदुरबार जिल्हा ही काय डॉ. गावितांची खासगी प्रॉपर्टी आहे काय?