आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१८ हजार ५०० कोटींच्या कामांची केवळ घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जानेवारी महिन्यात जळगाव शहरात तब्बल १८ हजार ५०० काेटी रुपयांच्या विकास कामांची घाेषणा करून त्या कामाचे भूमिपूजनही केले हाेते. नऊ महिन्यांनंतर मंत्री गडकरी शुक्रवारी जिल्ह्यात येत असताना त्यांनी दिलेल्या घाेषणा अाणि भूमिपूजन केलेल्या कामांपैकी एकही काम सुरू झालेले नाही. लवकरच कामे सुरू हाेतील, असे ठासून सांगणारे मंत्री या दाैऱ्यात या कामाविषयी निधीविषयी नेमके काय सांगतील, यासंदर्भात जळगावकरांमध्ये विशेष उत्सुकता अाहे.
नितीन गडकरी यांनी २५ जानेवारी राेजी सागर पार्क येथील जाहीर कार्यक्रमात जम्बाे कामांची घाेषणा केल्या हाेत्या. तसेच जळगाव शहरासाठी भरभरून निधी देण्याची घाेषणा केली हाेती. या केवळ घाेषणा करून लवकरच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ हाेणार असल्याचेही गडकरी यांनी ठासून सांगितले हाेते. दरम्यान, त्यांनी याच कार्यक्रमात व्यासपीठावर भूमिपूजन केलेल्या कामांपैकी एकाही कामाला अद्याप प्रारंभ झालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर गडकरी यांचा शुक्रवारी हाेणार दाैरा जळगावकरांसाठी उत्सुकतेचा विषय अाहे. त्यांनी दिलेल्या अश्वासनासंदर्भातते पुन्हा काय बाेलणार, याबाबत विशेष उत्सुकता अाहे. अाघाडी शासनाच्या काळात संपूर्ण प्रक्रिया अाणि टेंडर पूर्ण झालेले महामार्गाच्या चौपदरीकरणाचे टेंडर रद्द करून नव्याने टेंडर काढण्यात अाले अाहे. नवीन टेंडरमध्ये तीन टप्पे करण्यात अाले असून त्यात जळगाव जिल्ह्यातील हद्दीसाठी स्वतंत्र टेंडर काढले अाहे. मात्र, भाजप सरकार सत्तेवर येऊन दाेन वर्षे उलटली तर नितीन गडकरींनी भूमिपूजन करून महिने उलटले तरी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही. हे काम केव्हा सुरू होईल, याकडे जळगावकरांचे लक्ष लागून आहे.

या हाेत्या घाेषणा
राष्ट्रीयमहामार्गाचे रुंदीकरण, काँक्रिटीकरण, महामार्गावर उड्डाण पुल
शिवाजीनगर, पिंप्राळा रेल्वेगेट अाणि दूध फेडरेशनजवळ रेल्वे पूल
नवापूर-नागपूर, अाैरंगाबाद- मुक्ताईनगर -इंदूर, पहूर-जळगाव, बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाचे चाैपदरीकरण
पहूर- चाळीसगाव मार्गाचे विस्तारिकरण
बातम्या आणखी आहेत...