आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचा खाविआला पाठिंबा; महापौरपदी लढ्ढा, उपमहापौरपदी कोल्हेंची निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी महापाैर निवडणूकीसाठी अर्ज भरल्यानंतर नितीन लढ्ढा अाणि ललित कोल्हे. - Divya Marathi
शुक्रवारी महापाैर निवडणूकीसाठी अर्ज भरल्यानंतर नितीन लढ्ढा अाणि ललित कोल्हे.
जळगाव - चुरशीची वाटणारी महापाैर उपमहापाैरपदाची निवडणूक अाता जवळजवळ एकतर्फी झाली अाहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खाविअा मनसेला पाठिंबा जाहीर करण्यात अाला अाहे. त्यामुळे महापाैरपदी नितीन लढ्ढा उपमहापाैरपदी ललित काेल्हे यांची निवड अाता एकतर्फी हाेणार, हे जवळपास निश्चित झाले अाहे. दाेन्ही पदांसाठी शुक्रवारी सहा जणांचे अाठ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याचा शनिवार हा शेवटचा दिवस अाहे. त्यामुळे भाजपच्या नगरसेविका सीमा भाेळेंच्या उमेदवारीकडे लक्ष लागून अाहे.

जळगाव महानगराचे प्रथम नागरिक असलेल्या महापाैर पदासाठी राजकीय रंग चढायला सुरुवात झाली असून, शुक्रवारी दुपारी दाेन्ही प्रमुख पक्षांकडून अर्ज दाखल करण्यात अाले आहेत. दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात नगरसचिव निरंजन सैंदाणे यांच्याकडे दाेन्ही पदांचे अर्ज सादर करण्यात अाले. या वेळी खाविअातर्फे महापाैर पदासाठी नितीन लढ्ढा वर्षा खडके यांनी दुपारी १२.५२ वाजेच्या मुहूर्तावर तर भाजपकडून ज्याेती चव्हाण यांनी दुपारी १.२८ वाजता अर्ज दाखल केला. उपमहापाैर पदासाठी मनसेकडून ललित काेल्हे विजय काेल्हे या पिता-पुत्रांनी दुपारी १२.५५ वाजता तर भाजपकडून विजयकुमार गेहींचा अर्ज दुपारी १.३० वाजता दाखल झाला. यात नितीन लढ्ढा ललित काेल्हे यांचे प्रमुख अर्ज असून, वर्षा खडके विजय काेल्हे यांचे डमी अर्ज असल्याचे सांगण्यात अाले. सूचक म्हणून महापाैर राखी साेनवणे रमेश जैन यांनी तर अनुमाेदक म्हणून उपमहापाैर सुनील महाजन विष्णू भंगाळे यांनी स्वाक्षरी केली. तसेच खडकेंच्या अर्जावर ममता काेल्हे सविता शिरसाठ यांनी स्वाक्षरी केली. भाजपच्या वतीने चव्हाण यांच्या अर्जावर डाॅ.अश्विन साेनवणे उज्ज्वला बेंडाळे यांनी, तर गेहींच्या अर्जावर वामनराव खडके उज्ज्वला बेंडाळे यांनी स्वाक्षरी केली.

पुढे वाचा... राष्ट्रवादीने काढले पत्रक