आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनात नायट्रोजन गॅस भरण्याकडे नागरिकांचा कल वाढला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- वाढत्या उन्हाच्या पार्‍यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांच्या टायरमध्ये नायट्रोजन गॅस भरण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. यामुळे पंर होण्याचे प्रमाण कमी होऊन ट्यूब फुटण्याचा धोका कमी झाला आहे.

उन्हाची तीव्रता वाढल्याने आरोग्यावर परिणाम जाणवतो. तसाच दुचाकी, चारचाकी वाहनांवरदेखील होत असतो. यात वाहनांचा रंग फिका पडणे, वाहनांमधून पेट्रोल उडणे, या समस्या उद्भवतात. त्यादृष्टीने नागरिकही उपाययोजना करत असतात. पण वाहनांच्या टायरमध्ये नियमित हवा भरण्याव्यतिरिक्त त्याची फारशी काळजी आपण घेत नाही. मात्र, उन्हाच्या तीव्रतेमुळे वाहन पंर होऊ नये, तसेच ट्यूब फुटू नये म्हणून टायरमध्ये नायट्रोजन गॅस भरण्याची सुविधा शहरात उपलब्ध झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही सुविधा वाहनधारकांना दिली जात आहे. परंतु याविषयी वाहनधारकांना फारशी माहिती नसल्यामुळे याचा फायदा घेणार्‍या वाहनधारकांची संख्या सुमारे तीन टक्के आहे.

असे आहेत फायदे
> टायर गरम होत नाही.
> वारंवार टायर प्रेशर तपासणे टळते.
> नायट्रोजन गॅस प्रसरण पावत नाही. त्यामुळे टायरमध्ये सारखे प्रेशर राहते
> टायर डिस्क गंजत नाही.
> पंरचे प्रमाण कमी आणि वाहनाचा अँव्हरेज वाढतो.

उन्हाळ्यात पसंती
टायरच्या किमती प्रचंड वाढल्यामुळे वाहनधारकांचा नायट्रोजन गॅस भरण्याकडे कल वाढत आहे. हा गॅस हवेपेक्षा हलका असल्यामुळे टायर फुटण्याचा धोका उद्भवत नाही. उन्हाळ्यात याकडे वळणार्‍या ग्राहकांची संख्या मोठी आहे. मनीष पाटील, संचालक- इंडिया गॅरेज

अँव्हरेजमध्ये वाढ
दुचाकी वाहनात गेल्या वर्षभरापासून नायट्रोजन गॅस भरत आहे. त्यामुळे अँव्हरेजमध्येही वाढ झाली आहे.
-अविराज शास्त्री, वाहनधारक

सव्वा लाखाचे मशिन
एका गॅरेजमध्ये दिवसाला 25 ते 30 वाहनांमध्ये नायट्रोजन गॅस भरला जातो. उन्हाळा लागण्यापूर्वी जेमतेम 10 वाहनांमध्ये गॅस भरला जात होता. एकूण महिनाभरात 300 ते 500 वाहनांमध्ये हा गॅस भरला जातो. यासाठी सव्वा लाखाचे मशीन असून वर्षाकाठी 25 हजार रुपये फिल्टरसाठी खर्च येत असल्याचे जाणकारांनी सांगितले.

10 ठिकाणी व्यवस्था
उन्हामुळे सातत्याने ट्यूब फुटण्याचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांचा याकडे कल वाढू लागला आहे. शहरात तीन वर्षांपूर्वी एकाच गॅरेजमध्ये नायट्रोजन गॅस भरण्याची सुविधा उपलब्ध होती. सद्य:स्थितीत शहरात 10 ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका दुचाकीच्या दोन्ही टायरमध्ये नायट्रोजन गॅस भरण्यासाठी 20 रुपये तर चारचाकीसाठी 30 रुपये प्रती चाक याप्रमाणे गॅस भरला जात आहे.