आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Earth Quack Measurment System Install On Hatnoor

‘हतनूर’वरील भूकंप तीव्रता मोजणी यंत्र नादुरुस्तच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (मेरी) हतनूर धरणावर भूकंप तीव्रता मोजणी (भूकंपालेख) यंत्र बसवले आहे. मात्र, गेल्या पंधरवड्यापासून नादुरुस्त असलेले हे यंत्र दुरुस्तीसाठी नाशिक येथे पाठवण्यात आले. मात्र, धरण परिसरात भूकंपाच्या तीव्रतेची नोंद घेणारी कोणतीही पर्यायी यंत्रणा कार्यान्वित नसल्याने धरणाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

मंगळवारी इराणला 7.8 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला. देशातील गुजरातसह राज्यस्थान, हरियाणा आणि दिल्ली भागातही याचा परिणाम जाणवला. जिल्ह्यामध्ये अशी कोणतीही नोंद तूर्त समोर आलेली नाही. मात्र, धरण क्षेत्रात पाण्याचा दबाव असल्याने भूकंपाचा धोका वाढतो. यामुळे मोठय़ा प्रकल्पांवर भूकंपमापक यंत्रणा बसवलेली असते. 24 तास कार्यरत असलेली ही यंत्रणा आपत्तीच्या कालावधीत या कारणांच्या मूळापर्यंत जाण्यासाठी मदतीची ठरते. नाशिक येथील ‘मेरी’ संस्थेने हतनूर धरणावर भूकंप तीव्रता मोजणी यंत्र बसवले होते. मात्र, हे यंत्रच नादुरुस्त असल्याने धरणावर सध्या भूकंप नोंदीची कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नसल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. 15 दिवसांपूर्वी नादुरुस्त झालेले यंत्र अजूनही दुरुस्त होत नसल्याने जलसंपदासह पाटबंधारे विभाग गंभीर नसल्याचे समोर आले आहे. आलेख पेपर जोडलेल्या भूकंपमापक यंत्राच्या मोटारीत 15 दिवसांपूर्वी बिघाड झाला. तो आजतागायतही दुरुस्त झालेला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. नियमानुसार भूकंप मोजणी यंत्र एक दिवसही बंद नसावे. मात्र, स्थानिक अधिकारी गंभीर असले तरी वरिष्ठ शासकीय यंत्रणेतील कासवगती हतनूर धरणाच्या सुरक्षेच्यादृष्टीने कमालीची घातक आहे.
4हतनूर धरणावरील भूकंपमापक यंत्र गेल्या पंधरवड्यात नादुरुस्त झाले होते. त्याची माहिती मेरी संस्थेला दिली. यानंतर टीमकडून पाहणीदेखील झाली. मात्र, त्याची दुरु स्ती जागेवरच करणे शक्य नसल्याने यंत्र नाशिक येथे पाठवण्यात आले आहे. एस.आर.पाटील, शाखा अभियंता, सावदा विभाग

धरणावर भूकंप मापक यंत्राची गरज का ?
धरणाच्या क्षेत्रात पाण्याचा दाब असल्याने 2.0 रिश्टर स्केलचे भूकंप वर्षातून अनेक वेळा होतात. अत्यंत सौम्य स्वरुपाचे भूकंप असल्याने कोणतेही नुकसान होत नाही. 2.9 रिश्टर स्केलवरील भूकंपाची मात्र जाणीव होते. धरण परिसरात 1 ते 1.5 रिश्टर स्केलचे भूकंप वारंवार होत असल्यास भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो