आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ध्या जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - दीपनगर वीजनिर्मिती केंद्राच्या स्वीच यार्डातील १३२ केव्ही उपकेंद्रातील उच्च क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर फुटला. त्यामुळे जळगाव, भुसावळसह अर्धा जिल्हा अंधारात होता.
जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पहूर या ठिकाणी १३२ केव्ही आणि ३३ केव्हीच्या वाहिन्यांवर वीजपुरवठा होतो. सोमवारी सायंकाळी ५.३० ते सहा वाजेदरम्यान दाब वाढल्यामुळे ट्रान्सफॉर्मर फुटला. त्यामुळे या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी रात्री उशिरापर्यंत विजेचा लंपडाव सुरू होता. जळगाव एमआयडीसी, मुक्ताईनगर आणि पहूर (ता. जामनेर) येथील प्रत्येकी १३२ केव्ही, तर जळगाव, बोदवड आणि जामनेर येथील प्रत्येकी ३३ केव्ही क्षमतेच्या वीज वाहिन्यांवरील पुरवठाखंडित झाला. भुसावळ शहरातील दोन्ही भागांना साकेगाव आणि चोरवड येथून वीजपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे या पुरवठ्यावरही परिणाम झाला. वीज वितरण कंपनीने फुटलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारपर्यंत या ट्रान्सफॉर्मरचे काम पूर्ण होईल.

संच तीन हँडट्रिप
दीपनगरऔष्णिक केंद्रातील स्वीच यार्डात वीज वितरण कंपनीच्या बिघाडामुळे २१० मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक तीन हँडट्रिपमुळे बंद करण्यात आला. त्यामुळे किमान १७० मेगावॅटचा वीजपुरवठा होऊ शकला नाही. दरम्यान, दुरुस्तीच्या कामानंतर संच क्रमांक तीन पूर्ववत सुरू होईल.