आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘तो’ साप उडत नाही, झाडावरून उडी मारतो!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: पाटणादेवीच्या जंगलात आढलेला हाच तो रुका स्नेक
जळगाव - पक्षांप्रमाणेहवेत उडणा-या सापांच्या प्रजाती भारतात आढळून येत नाही. गेल्या चार दिवसांपूर्वी पाटणादेवी परिसरातून प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रात दिसून येणारा साप हा रुका स्नेक या प्रकारचा आहे. परंतु तोदेखील हवेत उडू शकत नाही. अशा प्रकारचे साप उंच झाडावरून कमी उंचीच्या झाडावर उडी घेतात. या प्रकाराला हवेत उडणे म्हणत नाहीत, असे पर्यावरण अभ्यासक पक्षीतज्ज्ञ मारुती चित्तंपल्ली यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
पाटणादेवी परिसरात उडणारा साप आढळल्याच्या बातम्या व्हाट्स अॅपवर झळकत आहेत. शहरातील काही नागरिकांमध्ये या वृत्तामुळे भीतीचेही वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्षात मात्र हा साप हवेत उडू शकत नाही. पाटणादेवी परिसरात वनविभागाने दोन कॅमेरे बसवले आहेत. त्यात २७ जानेवारी रोजी रात्री ७.५० वाजता झेप घेणा-या रुका स्नेक या सापाचे छायाचित्र कैद झाले आहे.

भारतात उडणारे साप नाहीत
भारतात उडणारे साप आढळून येत नाहीत. त्यामुळे सध्या अाढळणारे साप हे रूका स्नेक अाहे. ते उडत नसून फक्त झाडावरून उडी मारतात. झेप घेणारे सरडे आहेत. या सरड्यांच्या शरीरावरील कातडी झेप घेताना उघडली जाते. ते हवेत उडत नाहीत पण काही मीटर अंतरावरून झेप घेऊ शकतात. मारुतीचित्तंपल्ली, पक्षीतज्ज्ञ

असे आहे या सापाचे विविध वैशिष्ट
रुकास्नेक असे या सापाचे नाव आहे. हा साप बिनविषारी असताे. तो झाडावरच राहतो. एका उंच झाडावरून दुस-या कमी उंचीच्या झाडावर जाण्यासाठी तो साप खाली उडी घेतो. दोन-तीन सेकंदात तो झाडाच्या फांदीवर पोहोचतो. ही क्रिया करण्याच्या दृष्टिने त्या सापाचे शरीर लवचिक असते. या क्रियेला हवेत उडणे, असे म्हणता येत नाही. सध्या त्यांचा प्रजनन काळ असल्यामुळे मादा सापांकडे आकर्षण वाढत असते. ज्या भागात मादा साप असतील त्या भागात रुका स्नेकचा वावर वाढला आहे. त्यामुळे ते पाटणादेवी परिसरात दिसत आहे.

निव्वळ अफवा
उडणारेसाप म्हणून अफवा परसवली जात आहे. रुका स्नेक हे एका झाडवरून दुस-या झाडावर झेप घेतात. ते पक्षाप्रमाणे हवेत उडत नाहीत. बाळकृष्णदेवरे, सर्पमित्र

तो फोटो अभ्यासाठी उपयुक्त
पाटणादेवीपरिसरात वनविभागाने बसवलेल्या कॅमेरात कैद झालेल्या छायाचित्रात रुका स्नेक आढळून आला आहे. ताे सापाचा फाेटाे अाता अभ्यासासाठी उपयोगी ठरेल. या सापाविषयी आजपर्यंत ऐकिव माहिती होती. आता तो प्रत्यक्षात दिसला आहे. राजेशठोंबरे, पक्षीमित्र