आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पळवलेल्या मुलीचा दीड महिन्यापासून तपास नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शिवधाममंदिर परिसरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला २५ वर्षीय युवकाने दीड महिन्यापासून फूस लावून पळवून नेले आहे. या प्रकरणी पालकांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली अाहे. तसेच मुलीला पळवणाऱ्या मुलाचे मोबाइल क्रमांक, फोटोही दिला अाहे तरीदेखील पोलिसांनी काही एक तपास केला नाही. त्यामुळे संतापलेल्या पालक शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून कर्मचाऱ्यांना तपासाबाबत विचारणा केली.
आर.आर.विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकणारी मुलगी २० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता प्रात्यक्षिक असल्याने शाळेत गेली हाेती. तिने तिच्या पप्पांना मला दुपारी ४.३० वाजता वेळेवर घेण्यासाठी या असेही सांगितले हाेते. त्यानुसार वडील शाळेत गेले पण ती तेथे मिळून आली नाही. खूप शोधाशोध केल्यानंतर ती मिळून अाल्याने हताश झालेल्या वडिलांना जिल्हापेठ पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार केली. त्यानंतर तीन दिवसांनी पालकांना अापल्या मुलीला घरासमाेरच्या अपार्टमेंटमध्ये टाइल्स बसवण्याचे काम करणारा राजस्थानी कारागीर महेश बाजा (मूळ रा. खेरजोली, ता. चोमू, जि. जयपूर) याने पळवून नेल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार त्यांनी पाेलिसांना महेशचा फाेटाे त्याची सर्व माहिती दिली. या गाेष्टीला दीड महिना झाला तरीदेखील पाेलिस महेश मुलीचा शाेेध घेत नसल्याने पालक प्रचंड संतापले अाहेत.

पंतप्रधानांना निवेदन
मुलीच्याआईने गुरुवारी पोलिस निरीक्षक श्याम तरवाडकर यांची भेट घेतली पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. शुक्रवारी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनीसुद्धा पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करीत या प्रकरणाचा तपास त्वरित करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तपास करावा यासाठी मुलीच्या आईने पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवले आहे.

आई-वडील दोन वेळा गेले राजस्थानला
मुलीचाशाेध घेण्यासाठी अाई-वडील दोन वेळा राजस्थान येथे महेशच्या घरी गेले. मात्र, महेशही बेपत्ता आहे. त्याचा फोन लागत नाही. अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. त्यानंतर पालकांनी राजस्थान पोलिसांशी संपर्क केला. तेथील पोलिसांनी महेशचा तपास सुरू केला. दिलेल्या मोबाइल क्रमांकावरून त्याचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. त्याचा एक मित्र आंध्र प्रदेशमध्ये असल्याची माहिती राजस्थान पोलिसांनी मिळवली आहे. महेशही त्याच्यासोबत असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मात्र, या प्रकरणात जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीच ठोस कार्यवाही केलेली नाही. असा आरोप मुलीच्या आईने केला आहे.
संपर्कच नसल्यामुळे पालक चिंतेत
मुलीला महेशने पळवून नेल्याची अधिकृत माहिती पालकांना मिळाली आहे. ती स्वत:च्या इच्छेने गेली असेल तर कदाचित दीड महिन्यात तिने एकदा तरी घरी संपर्क करून कळवले असते. पण तिचा फोनही त्या दिवसापासून बंद आहे. तर महेशच्या कुटुंबातील लोकही पूर्ण माहिती देत नाहीत. पोलिसदेखील या प्रकरणाची योग्य चौकशी करीत नसल्यामुळे आपल्या मुलीसोबत काही गैरप्रकार तर होत नसेल ना? या चिंतेने पालक हताश झाले आहेत. महेश हा मुकेश चौधरी नावाच्या ठेकेदाराकडे काम करायचा घटनेच्या एक दिवस आधीच मुकेशने त्याला ३८ हजार रुपये दिले होते. त्यामुळे महेश कुठे असेल? याची कल्पना मुकेशला असावी, असा संशयही पालकांनी व्यक्त केला आहे.