आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस-राष्ट्रवादीत निधीचा दुष्काळ; "कोरड्या' प्रचारामुळे नाराजीचा सूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दहा दिवस उरले असताना जिल्ह्यात उमेदवार, पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या दृष्टीने निवडणुकीचे वातावरण मात्र तापलेले नाही. ऑक़्टोबर हीटमुळे उन्हाचा चटका वाढल्याने सावलीचा आडोसा घेऊन प्रचारात उतरलेल्या उमेदवारांनादेखील पक्षाच्या निधीची प्रतीक्षा आहे.
कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तर पक्षनिधीचीच चर्चा अधिक आहे. दरम्यान, सर्वच मतदारसंघांमध्ये निधी द्यावा लागणार आहे. मात्र, वर्गवारी करून निधी देण्यास विलंब होणार असल्याने कार्यकर्त्यांनाही कोरडा प्रचार नकोसा झाला आहे.
जिल्ह्यातील ११ मतदारसंघांमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व कॉँग्रेस या प्रमुख पक्षांचे उमेदवार आहेत. काही मतदारसंघांमध्ये मनसेनेदेखील उमेदवार दिले आहेत, तर काही ठिकाणी अपक्षांचे प्रमुख उमेदवारांना तगडे आव्हान आहे. चौरंगी, पंचरंगी आणि बहुरंगी लढतींमध्ये मतदारसंघांतील राजकीय वातारण तापेल, उमेदवारांना खर्च करावा लागेल, मतदारांचा दसरा आणि दिवाळी जोरात असेल आदी चर्चांना ऊत आला होता. मात्र, लढती निश्चित होऊन चार दिवस उलटूनदेखील मतदारसंघांमध्ये राजकीय वातावरण थंडच असल्याची स्थिती आहे.
अनिश्चिततेच्या वातावरणात घरून पैसे ओतण्यास उमेदवार तयार नाहीत. पूर्वीच तयारी केलेल्या उमेदवारांनी कार्यकर्त्यांवर खर्च करणे सुरू आहे.