आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No More Income In New Financial Year In Jalgaon Corporation Through Tax

नव्या वर्षात जळगाव पालिकेच्या वसुलीचा भोपळाही फुटेना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी वसुलीचा जोर वाढल्याने तिजोरीत प्रचंड खजिना जमा झाला. मात्र, नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात पालिकेसाठी फारशी समाधानकारक राहिलेली नाही. घरपट्टी विभाग वगळता अन्य उत्पन्नाचे स्त्रोत असलेल्या विभागातील वसुलीचा भोपळाही फुटू शकलेला नाही.

हुडकोच्या कर्जफेडीमुळे बेजार झालेल्या महापालिकेला एकेक पैशांची गरज भासत आहे. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी प्रचंड उत्साहात वसुलीच्या कामाला लागलेल्या कर्मचाऱ्यांनी वसुलीचा टक्का बऱ्याच अंशी वाढवला. सलग दोन महिने कामाला जुंपलेल्या कर्मचाऱ्यांनी नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात आनंददायी केली आहे. त्याचा परिणाम म्हणजे पालिकेच्या जमा-खर्चाचे साप्ताहिक नोंदीत जमा रकमेपेक्षा खर्चाचा आकडा अधिक पाहायला मिळत आहे.
एलबीटी विभागाने गेल्या १५ दिवसांत ७२ लाख ६३ हजार ६२१ रुपये वसूल केले असून याव्यतिरिक्त खुला भूखंड, किरकोळ वसुली पाणीपुरवठा, नागरी हिवताप योजना, मोठ्या निवासी इमारतीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न शून्य आहे. एलबीटी घरपट्टी विभाग वगळता अन्य विभागांनी वसुलीचा भोपळाही फोडला नसल्याने हे विभाग अजूनही जुन्या आकड्यांच्या वसुलीतच गुंतले की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. ते ११ एप्रिलदरम्यान पालिकेच्या तिजोरीत १६ कोटी ३३ लाख हजार ३४० रुपये जमा झाले यात आरंभीची रक्कम १५ कोटी ५३ लाख ९७ हजार ८९० रुपये वगळले तर चालू आर्थिक वर्षाची सुरुवात उत्पन्नापेक्षा जास्त खर्चाने झाली आहे.

१० टक्के सूट

घोषणा होऊन दोन महिने उलटले तरी आदेश काढायचा विसर पडलेल्या महापालिका प्रशासनाने आगाऊ घरपट्टीचा भरणा केल्यास एप्रिल महिन्यात १० टक्के सूट देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी येत्या १० दिवसांत नागरिक या योजनेचा लाभ घेतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.