आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Need Of Internet To Get Information Of Indian Railway On Mobile

इंटरनेट न वापरता कळेल रेल्वेचे वेळापत्रक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मोबाइलवर इंटरनेटचा वापर न करता इंडियन रेल्वेचे संपूर्ण देशभरातील वेळापत्रक, इच्छित स्थळी जाण्यासाठी उपलब्ध गाड्या, त्यांचे भाडे, कोच पोझिशनसह विविध प्रकारची माहिती ‘इंडियन रेल्वे टाइम-टेबल’ या अ‍ॅपवर पाहता येणार आहे. हे अ‍ॅप गोदावरी व देवकर अभियांत्रिकीच्या दोघा विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. या अ‍ॅपचा देशभरातील 60 हजार युजर्स वापर करत असून, 864 प्रवाशांनी चांगल्या कमेंट्सही दिल्या आहेत.

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे प्रोग्रॅमर दर्पण उद्धव पाटील व देवकर अभियांत्रिकीतील मकेनिकलच्या दुस-यावर्षाचा विद्यार्थी संकेत किशोर पाटील या दोघांनी ‘इंडियन रेल्वे टाइम-टेबल’ हे अ‍ॅप तयार केले आहे. याआधीही त्यांनी एसटीडी कोडचे अ‍ॅप तयार केले होते. त्याचा अनेकांना फायदा होत आहे. या यशानंतर त्यांनी मोबाइलवर इंटरनेटचा वापर न करता रेल्वेची माहिती सहज मिळेल असे अ‍ॅप तयार करण्याचा चंग बांधला. त्यानंतर त्यांनी ‘इंडियन रेल्वे टाइम-टेबल’ हे अ‍ॅप तयार केले.
या अ‍ॅपवर रेल्वेची सर्व माहिती सहज मिळत आहे. मात्र, या अ‍ॅपचा लाभ घेण्यासाठी अ‍ॅँड्रॉइड मोबाइल असणे आवश्यक आहे. त्यासाठी फक्त सुरुवातीलाच हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यापुरता इंटरनेटचा वापर करावा लागतो. त्यानंतर इंटरनेटशिवाय केव्हाही या सुविधेचा लाभ घेता येईल. जावा लॅँग्वेजवर कोड करून प्रोग्रॅम तयार करण्यात आला आहे. रेल्वेप्रमाणेच आता ऑफलाइनमध्ये एसटी महामंडळाच्या बसेसच्या वेळापत्रकाचे अ‍ॅप तयार करण्याचाही
मानस आहे.
ही सुविधा मिळणार
हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर ट्रेनची उपलब्धता, ट्रेनचे नाव व नंबर, संबंधित स्टेशनवरून जाणा-यागाड्या, सीट मॅप, पीएनआर स्टेटस, ट्रेन स्टेटस, सेट फेव्हरीट, शेअर ट्रेन, प्रवास भाडे, कोच पोझिशन, सीटची उपलब्धता आदींची स्थिती 24 तास पाहता येणार आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. फक्त पीएनआर व ट्रेन स्टेटस पाहण्यासाठी आपल्याला एक एसएमएस पाठवावा लागतो व त्यासाठी तीन रुपये लागतात.

मोबाइलवर असे करावे अ‍ॅप डाऊनलोड
अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी अ‍ॅँड्रॉइड मोबाइलवर गुगल प्ले स्टोअरवर ‘इंडियन रेल्वे टाइम-टेबल’ हे अ‍ॅप सर्च करावे. तेथे इंजिनाचा लोगो व मोफत असे लिहिलेला आयकॉन येईल. साडेतीन एमबीचे हे अ‍ॅप डाऊनलोड करावे. फक्त त्या वेळीच इंटरनेटची गरज भासेल; त्यानंतर विनाइंटरनेटचा वापर करता अ‍ॅपचा उपयोग करता येणार आहे.