आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा कर्मचाऱ्यांना 12 दिवसांत पगार अशक्य, ऐन दिवाळ अंधारात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दाेन महिने उशीराने पगाराची सवय झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना अाॅगस्ट महिन्याचा पगार अाॅक्टाेबरमध्ये करण्यात अाला. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा १२ दिवसात पगार करणे प्रशासनाला अवघड झाले अाहे. त्यामुळे एेन दिवाळीत अाणखी पैसा हाती पडेल अशी कर्मचाऱ्यांना असलेली अाशा धुसर झाली अाहे. 
 
महापालिकेची अार्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली अाहे. कार्यरत कर्मचाऱ्यांचे पगार असाे की, निवृत्तांचे पेंशन यासाठी पालिकेच्या तिजाेरीत पुरेशी रक्कम नसल्याने दाेन ते तीन महिने उशिराने पगार केले जात अाहेत. सध्या एलबीटी बंद झाल्याने शासनाकडून दर महिन्याला मिळणाऱ्या अनुदानावर पालिका प्रशासनाला अवलंबून रहावे लागत अाहे. मालमत्ता कराचा भरणा देखील सणाेत्सवाच्या काळात काहीसा कमी झाल्याचे सांगितले जात अाहे. त्यामुळे प्रशासनाने अाॅगस्ट महिन्याचा पगार अाॅक्टाेबर राेजी केला हाेता. 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना अाणखी काही रक्कम मिळेल असे अपेक्षित हाेते; परंतु शिक्षकांच्या याचिकेत अवमान हाेणार असल्याने नाहक डाेकेदुखी टाळण्यासाठी प्रशासनाने शिक्षकांच्या पगारासाठी एेनवेळी काेटी १० लाखांची रक्कम वर्ग केली. त्यामुळे दिवाळीत कर्मचाऱ्यांना द्यायची महागाई भत्ताची रक्कमही हाती राहिलेली नाही. अशा परिस्थितीत १२ दिवसात पगाराची रक्कम शिल्लक असलेल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा अानंद घेता येणार अाहे अन्यथा खरेदीसाठी नेहमीप्रमाणे व्यवस्था करावी लागणार असल्याचे सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...