आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूर्त राजकारण नाही, खटल्यावर लक्ष - सुरेश जैन यांची भूमिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - साडेचार वर्षांनंतर जळगावात परतलाे अाहे, सध्या घरीच राहणार असून राजकारणात परतण्याबाबत तूर्त विचार केलेला नाही. खटल्याचे कामकाज सुरू असल्याने त्याकडेच लक्ष देणार अाहे. परंतु समाजकारण हा पिंड असल्याने ते सुरूच ठेवणार असल्याचे मत माजी अामदार सुरेश जैन यांनी माध्यमांशी बाेलताना व्यक्त केले. साडेचार वर्षे कारागृहात राहिल्याने स्वातंत्र्याचे माेल अधिक चांगल्या प्रकारे कळाल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

जामीन झाल्यानंतर सुरेश जैन शनिवारी जळगावात अाले. साडेचार वर्षांनी त्यांनी प्रथमच त्यांच्या शिवाजीनगर या निवासस्थानी पाऊल ठेवले. या वेळी माध्यमांशी बाेलताना त्यांनी जामिनावर सुटका झाल्यानंतर जळगावात अाल्याचा विशेष अानंद असल्याच्या भावना व्यक्त केल्या. कारागृहामध्ये स्वातंत्र्याचे माेल कळाले, काेणलाही कारागृहाचा अनुभव येऊ नये, अशी माझी भावना अाहे. सामाजिक, राजकीय अायुुष्यात अनेक लाेकांची कामे केल्याने लाेकांचे अाजही प्रेम कायम अाहे. ते यापुढेही कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. राजकारणाबाबत निश्चित विचार नसला तरी समाजकारण हा पिंड असल्याने अाणि सेवा हा स्थायी भाव असल्याने समाजकारणात सक्रिय राहणार अाहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे महिनाभर तरी विश्रांती घेऊन नंतर पुढचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...