आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराची वाट लावण्याची प्रशासनाने सुपारीच घेतली - नितीन लढ्ढा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उत्पन्नवाढीसाठी काेणतेही प्रयत्न हाेत नसून, काेट्यवधी रुपयांच्या मालमत्ता धूळ खात पडल्या अाहेत. तसेच प्रशासनही नकारात्मक मानसिकतेत अाहे. प्रशासनाने शहराची वाट लावायची जणू सुपारीच घेतली असल्याचा अाराेप खाविअाचे नेते नितीन लढ्ढा यांनी केला. या वेळी त्यांनी प्रशासनाकडे बाेट करत थेट अायुक्तांनाच लक्ष्य केले हाेते.

स्थायी समितीच्या सभेत नेहमीच चर्चा हाेते. मात्र, त्याची अंमलबजावणी हाेत नाही. अातापर्यंत अनेकदा शासन निर्णय असतानाही प्रशासनाने शासनाचे मार्गदर्शन मागवले. परंतु, त्यावर उत्तर अालेले नाही. त्यामुळे चांगल्या कामांना ब्रेक लागत असल्याचा विषयावर चर्चा सुरू हाेती. १३व्या वित्त अायाेगाच्या निधीतून हुडकाचेे कर्ज फेडणे मनपा फंडातून रस्त्यांची कामे करण्याबाबत शासन निर्णय असताना शासनाच्या मार्गदर्शनाची गरज नव्हती, असा मुद्दा नितीन लढ्ढा यांनी मांडला.
लेखाधिकारी चंद्रकांत खरात यांनी लढ्ढा यांचा मुद्दा खाेडत शासनाच्या मान्यतेशिवाय परस्पर खर्च करता येणार नसल्याचा दावा केला. यावरून दाेघांमध्ये बराच वेळ शाब्दिक युद्ध रंगले.
...तर अायुक्त झाेपले हाेते काय?
अधिकारी एेकून घ्यायला तयार नसल्याचे लक्षात येताच लढ्ढा यांनी प्रशासनाची नकारात्मक मानसिकता अाहे. त्यामुळे डाेके फाेडून काही उपयाेग नसल्याचा अाराेप केला. महापालिका प्रशासन करते तेव्हा सगळे चालते अाणि अाम्ही प्रस्ताव दिला म्हणजे शासनाचे निर्णय अाठवतात. सन २०११ ते १५दरम्यान शासनाकडे निधीबाबत किती प्रस्ताव पाठवले? असा सवाल करत तेव्हा अायुक्त झाेपले हाेते काय? असा अाराेप केला. १३व्या वित्त अायाेगातून घनकचरा संकलनासाठी वाहने खरेदी केली. ताे खर्च बेकायदेशीर अाहे का? असा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाने शहराची वाट लावायची जणू सुपारीच घेतली अाहे.
शहर विकासाचा एकही सकारात्मक निर्णय घेण्यात अालेला नाही. लाेकशाही संपली असून प्रशासकीय राजवट सुरू झाली अाहे. त्यामुळे अाता सभागृहात यायचे की नाही? याचा िवचार करावा लागेल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
सभापतींची सहमती
नितीन लढ्ढा यांनी सभागृहात प्रशासनाच्या भूमिकेवर घणाघाती टीका केल्यानंतर प्रशासन ज्या पद्धतीने वागत अाहे, ते याेग्य असल्याचे सांगत लढ्ढा यांच्या मताशी सहमत असल्याचा दुजाेरा सभापती ज्याेती चव्हाण यांनी िदला. त्यामुळे प्रशासनाविराेधात सत्ताधारी भाजपसाेबत राष्ट्रवादीदेखील उभी ठाकल्याचे चित्र पाहायला मिळाले.
प्रशासन प्रस्ताव देईना
महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी हुडकाेसंदर्भात पालिकेने प्रस्ताव द्यावा, असे म्हटले हाेते. त्यानंतर गेल्या अाठवडाभरापासून महापाैर उपमहापाैरांनी अायुक्त अाणि लेखाधिकाऱ्यांना अावश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव तयार करून देण्याचे सांगितले. मात्र, अद्यापही प्रस्ताव तयार करून िदला जात नसल्याचे उपमहापाैर सुनील महाजन यांनी पत्रकारांशी बाेलताना सांगितले. एकीकडे प्रस्ताव देण्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे पालिकेतील अधिकारी माहिती देत नाही, अशी स्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या मनात नेमके काय अाहे? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली अाहे.