आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन उमेदवारीस प्रतिसाद नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल- तालुक्यातील५० ग्रामपंचायतींमध्ये उमेदवारी दाखल करण्यास सोमवारपासून सुरुवात झाली. मात्र, ऑनलाइन उमेदवारी दाखल करण्याच्या प्रक्रियेस दोन दिवसांत केवळ २७ उमेदवारांकडून प्रतिसाद मिळाला. ऑनलाइन अर्ज भरताना अडचणी नको, म्हणून १८ ग्रामपंचायतींमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करणे बंधनकारक आहे. दरम्यान, ५० ग्रामपंचायतींमधून १८५ प्रभागांतून ४८७ सदस्यांची िनवड होईल. मात्र, यासाठी दोन दिवसांत अवघे २७ इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. अजूनही काही इच्छुक ऑनलाइन उमेदवारी अर्ज कसे दाखल करावे? याबाबतची माहिती घेताना दिसत आहेत.
रावेर तालुक्यातीलइतर ग्रामपंचायतींसोबतच विवरे खुर्द आणि विवरे बुद्रूक येथील ग्रामपंचायतींची निवडणूक चांगलीच गाजण्याची चिन्हे आहेत.

विवरे खुर्दचे सरपंचपद ओबीसी राखीव आहे. त्यामुळे मावळते सरपंच संजय महाजन सहकारी पुन्हा भाग्य आजमावण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. महाजन यांचे प्रतिस्पर्धी रामचंद्र देशमुख यांनीदेखील तयारी चालवली आहे. गेल्या वेळी (कै.) डी. एन. महाजन यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला सत्ता मिळाली होती. विवरे बुद्रूक येथील सरपंचपद मागासवर्गीय महिलेसाठी राखीव अाहे. या निवडणुकीत माजी सरपंच जनार्दन पाचपांडे यांच्यासमोर पुन्हा मानस कुलकर्णी, यादवराव पाटील यांच्या गटाचे आव्हान आहे. गेल्या निवडणुकीत पाचपांडे यांच्या पॅनलला अपेक्षित यश मिळाले नव्हते. मानस कुलकर्णी, धनजी लढे, यादवराव पाटील, वासुदेव नरवाडे, दत्तात्रय पाटील यांच्या पॅनलला बहुमत मिळाले होते.

....तरीही गर्दी
इंटरनेटसुविधा नसलेल्या डांभुर्णी, किनगाव बुद्रूक, डोणगाव, चिंचोली आणि उंटावद या पाच गावांतील उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी किनगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या संग्राम कक्षात व्यवस्था केली आहे. परिणामी निवडणूक नसूनही किनगाव खुर्दमध्ये अनेकांची गर्दी होताना दिसत आहे.

येथे केली सोय
पंचायतसमिती सभागृहात संग्राम कक्षातर्फे टाकरखेडा, बोरावल खुर्द, बोरावल बुद्रूक, भालशिव, पिंप्री, काेळन्हावीसह ज्या ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेटची अडचणी असेल त्यांच्यासाठी १२ संगणक ठेवले आहेत. यामुळे इच्छुकांना अर्ज भरणे सोयीचे होईल.

असे मिळाले अर्ज
दोनदिवसांत अट्रावल ७, बामणोद ४, सांगवी बुद्रूक ५, मोहराळा, आडगाव प्रत्येकी २, दुसखेडा, अंजाळे, टाकरखेडा, किनगाव बुद्रूक, चिंचोली, दहिगाव, सावखेडेसिम येथे प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला.
बातम्या आणखी आहेत...