आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीत सहा रेल्वे गाड्यांना नो-रूम; प्रवाशांना डोकेदुखी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - ऑक्टोबरमधील दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आतापासून रेल्वे गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झालेले आहेत. पुणे, मुंबईकडून येणाऱ्या रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा यादी २०० पेक्षा जास्त असून सहा गाड्यांना नो-रूम आहे. दिवाळीनंतर दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यांचीदेखील यापेक्षा वेगळी स्थिती नसल्याने प्रवाशांना तत्काळ तिकिटाशिवाय पर्याय नाही.

नोकरी, व्यवसाय-कामधंद्यानिमित्त बाहेरगावी असलेले अनेक जण दिवाळीसाठी गावाकडे परत येतात. लांबचा प्रवास असल्यास अनेक जण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. यामुळे दोन महिन्यांपासूनच पुणे, मुंबईकडून भुसावळकडे येणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. अनेक गाड्यांना २०० पेक्षा जास्त प्रतीक्षा यादी असल्याने ऐनवेळी प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांचा गोंधळ उडू शकतो. अन्यथा गाडीत उभे राहून अथवा आरक्षण असूनही खाली बसून प्रवासाची वेळ येऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अनेक गाड्यांचे आरक्षण फुल्ल आहे. किमान नोव्हेंबरपर्यंत ही स्थिती राहू शकते. यानंतर पुन्हा नाताळमुळे रेल्वेगाड्यांची गर्दी वाढेल.
पुण्याहून भुसावळ येथे येण्यासाठी २७ अाॅक्टाेबरचे अारक्षण करण्यासाठी गेलाे होतो. मात्र, चौकशी केल्यावर अारक्षण फुल्ल झाल्याचे कळाले. यामुळे अाता एेनवेळी तत्काळ तिकिटाशिवाय पर्याय नाही. तत्काळ तिकीट मिळाल्यास महामंडळाची बस किंवा इतर खासगी वाहनाने प्रवास करावा लागेल. यशवंत साेनवणे, रेल्वे प्रवासी, यावल
दरवर्षी दिवाळीच्या काळात रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होते. यामुळे मुंबई - भुसावळ किंवा पुणे-भुसावळ मार्गावरील प्रवाशांचे हाल होतात. ही अडचण सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोकणात गणेशोत्सवात सोडल्या जाणाऱ्या विशेष गाड्यांप्रमाणेच भुसावळ विभागतही सुविधा पुरवावी. संदीप देवडा, व्यापारी, भुसावळ

महामंडळाच्या बसेसकडे अनेकांचा कल
>तत्काळ तिकिटावर भर : लांबपल्ल्याच्यारेल्वेगाड्यांना आरक्षण मिळणे शक्य नसल्याने अनेक जण खासगी ट्रॅव्हल्स आणि बसचे आरक्षण करून घेत आहेत. तर काहींची मदार तत्काळ आरक्षण तिकिटावर आहे.
>२०ऑक्टोबरपासून गर्दी : ऑक्टोबरच्या२० तारखेपासून रेल्वेगाड्यांना गर्दी वाढते. यंदादेखील २० ते २४ तारखेपासून गाड्यांना प्रतीक्षा यादी आहे. २५पासून ३१ तारखेपर्यंत गाड्यांना नो-रूम असल्याने तिकीट मिळणे बंद आहे.
>खाली बसून प्रवास : कन्फर्मतिकीट मिळत नसल्याने काही प्रवाशांनी पर्याय म्हणून वेटिंग तिकीट काढले आहे. प्रवासाच्या तारखेपर्यंत तिकीट कन्फर्म झाले तर ठीक, अन्यथा आरक्षित डब्यात खाली बसून प्रवासाची तयारी आहे.
>हुतात्मा एक्स्प्रेस सोयीची : दिवाळीतपुणे, मुंबईकडून येणाऱ्या सर्वच गाड्यांना गर्दी आहे. हुतात्मा एक्स्प्रेस मात्र या कालावधीत अनेकांना सोयीची ठरेल. या गाडीची आरक्षण यादी सध्या १००च्या आत असल्याने संधी शक्य आहे.

एकमेव पर्याय असा
अारक्षण तिकीट मिळणे दुरापास्त झाल्यामुळे ज्या प्रवाशांना वेळेवर तिकीट पाहिजे असल्याने त्यांना अाता तत्काळ तिकिटाशिवाय पर्याय नाही, त्यामुळे प्रवाशांच्या एक ते दाेन दिवस अगाेदर तिकीट काढावे लागणार अाहे. अनेक प्रवासी अाता अाॅनलाइन तिकीट काढत अाहे तर काही जण रेल्वे एजंटकडे जाऊन कनफर्म तिकीट मिळवतात.
बातम्या आणखी आहेत...