आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ रेल्वेगाड्यांना ‘नो-रूम’, दिवाळीमुळे ‘हॉलिडे स्पेशल’ची प्रतीक्षा यादी लांबली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हॉलिडे स्पेशल 10 गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, त्यांनाही गर्दी वाढली आहे. तर पुणे-पटना एक्स्प्रेस, पुणे-नागपूर गरीब रथ, हुतात्मा एक्स्प्रेस, सचखंड एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस, कर्नाटक एक्स्प्रेस, झेलम, पंजाब मेल, नवजीवन एक्स्प्रेस अशा नऊ गाड्यांना ‘नो-रूम’ आहे.

पुणे -निजामुद्दीन या 5 नोव्हेंबरच्या गाडीला प्रतीक्षा यादी 108 तर 12 रोजीच्या गाडीला 49 आहे. शिर्डी-दिल्ली एसी स्पेशल, गोरखपूर-पुणे, नागपूर पुणे, निजामुद्दीन-पुणे, नागपूर-पुणे या गाड्यांची प्रतीक्षा यादीही लांबली आहे.

तत्काळ खिडकीवरही आरक्षण मिळण्यासाठी सकाळी नऊ वाजेपासून प्रवाशांच्या रांगा लागल्याचे चित्र प्रकर्षाने दिसून येत आहे.