आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक ऑक्टोबरला ‘नो व्हेइकल डे’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पर्यावरणाचा होणारा र्‍हास थांबवावा आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा बचाव व्हावा, या हेतूने ‘दिव्य मराठी’च्या ‘देश वाचवू’ अभियानांतर्गत 1 ऑक्टोबरला ‘नो व्हेइकल डे’ पाळण्यात येणार आहे.

रुपयाची घसरण रोखण्यासाठी इंधनाच्या वापरावर नियंत्रण आणणे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे इंधन वाचविण्यासाठी महिन्यातून एक दिवस ‘नो व्हेइकल डे’ पाळण्याचा निर्धार शहरातील विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांनी ‘दिव्य मराठी’तर्फे आयोजित संवादात केला आहे. त्यानुसार एक ऑक्टोबरला नो व्हेइकल डे म्हणून पाळला जाणार आहे. इंधन बचतीच्या विषयावर झालेल्या संवादात शहरातील नामांकित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. दिवसभर वाहने बंद ठेवून पर्यावरण बचावचा संकल्प केला जाणार आहे.