आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना ‘जलयुक्त’चे काम नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘जलयुक्तशिवार’ अभियानांतर्गत जलसंधारण लघुसिंचन विभागामार्फत केलेली कामे निकृष्ट असल्याचे अहवालातून उघड झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दोन ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या कामांचे बांधकाम ठेकेदार आर.एस.पाटील भारती कन्स्ट्रक्शनचे प्रदीप पाटील (जळगाव) यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यांना यापुढे ‘जलयुक्त शिवार’ अभियानाची कामे देण्याबाबत जिल्हास्तरीय समितीने निर्बंध घातले आहेत.
‘जलयुक्त शिवार’ अभियानांतर्गत २०१५-१६ या वर्षामध्ये जलसंधारण, लघुसिंचन या विभागामार्फत अमळनेर तालुक्यातील ढेकूसिम, अांबासन, चारम, जवखेडे १, जवखेडे एकतास या गावांत सिमेंट नालाबांधची कामे केली होती. या कामांचे थर्ड पार्टी ऑडिट होण्यासाठी ‘जलश्री’ या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन तपासणी केली. यात बांधकामांच्या पायाची खोली योग्य नसणे, वापरलेले सिमेंट मटेरियल निकृष्ट दर्जाचे होते. याबाबत तेथील ग्रामस्थांनीही तक्रारी केल्या होत्या. नालाबांधच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात आले आहे. वाळू, दगड देखील चांगल्या गुणवत्तेचे नव्हते. या बांधकामांची कारागिरीदेखील हलक्या गुणवत्तेची आहे. तसेच वापरलेली आसारीच्या सळया फक्त १० मि.मी.एवढ्या कमी क्षमतेच्या होत्या. मोजमाप पुस्तिका सादर केलेली नाही आदी त्रुटी या तपासणीतून समोर आल्या.

जळगाव जिल्ह्यात कामांना बंदी
जवखेडा१, एकतास, ढेकूसिम, ढेकू चारम या चार कामांचे बांधकाम ठेकेदार आर.एस.पाटील (जळगाव) यांनी केलेले असून, जवखेडा या कामाचे ठेकेदार भारती कन्स्ट्रक्शनतर्फे प्रदीप पाटील हे आहेत. या दोन्ही ठेकेदारांना यापुढे जिल्ह्यात कोणतेही काम करता येणार नसल्याने त्यांचा काळ्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...