आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोपड्यात अडीच लाखांची गांजाची शेती उद्ध्वस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - चोपडा तालुक्यातील मोराणे शिवारातील अनेर नदीकाठी असलेली गांजाची शेती शनिवारी गुन्हे शाखेच्या पथकाने उद्ध्वस्त केली. शुक्रवारपासूनच पथक शेतीवर गस्त ठेवून होते. खात्री पटताच शनिवारी छापा मारला तेव्हा 3 ते 4 फूट उंचीची गांजाची झाडे आढळून आली.

पोलिसांनी सर्व झाडे मुळासकट उपटून उद्ध्वस्त केली. उपटलेल्या झाडांचे वजन एक क्विंटल 30 किलो होते. त्याची किंमत सुमारे 2 लाख 60 हजार रुपये असल्याचा अंदाज आहे. हे शेत शिवाजी नाना पावरा हा कसत असल्यामुळे त्यालाही ताब्यात घेतले.

गांजा लागवडीचे रॅकेट
मध्य प्रदेश सीमा चोपडा तालुक्यातील आदिवासी भागाला लागून असून गांजा शेतीच्या लागवडीचे रॅकेटच या भागात असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पावरा याने सांगितले की, मला काही लोकांनी मेमध्ये गांजाच्या बिया दिल्या होत्या. त्या बियांची लागवड जून महिन्यात मी केली व सहा महिन्यानंतर ते स्वत:हून कापून घेऊन जाणार होते. मात्र हे लोक कोण याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.