आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Non Healthy Tree Plantation Foun At Jamner Taluka's Dhalgaon

जामनेर तालुक्यातील ढालगाव शिवारामध्ये गांजाची झाडे जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ढालगाव (ता. जामनेर) शिवारात गांजाच्या झाडांची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला. जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती माणिक पाटील यांच्यासह एकास अटक झाली.


माणिक मन्साराम पाटील यांच्या मालकीचे शेत गट क्रमांक 38 मध्ये कापणी केलेल्या गव्हाचे व मक्याच्या शेतात विहिरीलगत असलेल्या एक गुंठा जागेत पाटील यांनी सालदाराच्या मदतीने अवैधरित्या गांजाच्या झाडांची लागवड केली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास छापा टाकला. गांजाची 25 किलोची झाडे आणि चार किलो वजनाचा कोरडा गांजाची झाडे मक्याच्या कडब्याखाली लपवून ठेवल्याचे निदर्शनात आले. या वेळी 23 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शेतमालक माणिक पाटील व सालदार नवाब अन्वर तडवी यांना पोलिसांनी अटक केली आहे.