आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पसंख्याकांसाठीच्या अमराठी शाळांमध्ये मराठीचा तास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अल्पसंख्याकांसाठीच्या अमराठी शाळांतील वदि्यार्थ्यांना आता मराठी शिकवली जाणार आहे. यासाठी मानसेवी शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. स्पर्धा परीक्षा, राज्य सेवा परीक्षेतील इतर सर्वसाधारण वदि्यार्थ्यांच्या तुलनेत अल्पसंख्याक वदि्यार्थी मागे पडत असल्याने सरकारने अस्तित्वात असलेली ‘मराठी भाषा फाउंडेशन वर्ग’ ही संकल्पना सुधारित स्वरुपात स्वीकारली आहे. २०१५-१६ या वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे आता अल्पसंख्याक समाजातील वदि्यार्थीही मराठी बोलणार आहेत. शाळांनी मराठीचे तास घेतल्याचा अहवाल शिक्षणाधिका-यांना पाठवण्याची अट टाकण्यात आली आहे. राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने ही नवीन पद्धती स्वीकारली आहे.

त्यानुसार आता राज्यभरातील अशा अमराठी शाळांमध्ये (इंग्रजी माध्यम वगळून) नवीन पद्धतीने मराठी भाषा शिकवली जाणार आहे. अल्पसंख्याक समूहाच्या कल्याणासाठी पंतप्रधानांच्या १५ कलमी नवीन कार्यक्रमातही यावर भर दिला आहे. शासकीय सेवेत अल्पसंख्याक उमेदवारांचे प्रमाण वाढवण्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या आहेत. मराठी भाषेवर पुरेसे प्रभुत्व नसल्याने राज्यसेवा तसेच स्पर्धा परीक्षांत हे वदि्यार्थी तुलनेत मागे पडत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने अल्पसंख्याक शाळेतील आठवी ते दहावीच्या वदि्यार्थ्यांसाठी २००६ पासून प्रयत्न सुरू केले आहेत.

कालांतराने यातील काही पद्धती निरुपयोगी ठरल्यामुळे नवीन संकल्पनेनुसार आता मानसेवी तत्त्वावर शिक्षकांची नियुक्ती केली जाईल. यासाठी शिक्षकांना दरमहा पाच हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. त्यांची नियुक्ती नऊ महनि्यांसाठी असणार आहे. त्यानंतर त्यांची सेवा संपुष्टात येऊन नवीन वर्षी नव्याने निवड प्रक्रिया राबवली जाईल. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (निरंतर) यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.

निरंतरशिक्षणाधिका-यांवर जबाबदारी
आठवी,नववी, दहावीसाठी माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची मराठी क्रमिक पुस्तके असतील. या तीन वर्षांत व्याकरण, वाक्प्रचार, म्हणी, शब्दांच्या जाती, काळ, पत्रलेखन, वृत्तलेखन असे तंत्रशुद्ध मराठी शिकवले जाईल. तिमाही चाचणीतून वदि्यार्थ्यांची पातळी जाणून घेतली जाईल. निकालाचा अहवाल जिल्हा परिषदेत सादर होणार आहे. या वर्गासाठीचे हजेरीपत्रक वेगळे राहील. अचानक वर्गांना भेटी देऊन कामकाजावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी निरंतर शिक्षणाधिका-यांची राहील.


अहवालाची सक्ती
शासननिर्णयानुसार या वर्षापासून अमराठी शाळेत मराठीचा तास घेण्यात येणार आहे. संबंधित शाळांनी मराठीचा तास घेऊन अहवाल पाठवण्याची सक्तीआहे.एल.एस.बागुल, शिक्षणाधिकारी (निरंतर)

...तर शिक्षकांची नियुक्ती होईल रद्द
१८०ते २०० वदि्यार्थ्यांसाठी एक तर ३०० पर्यंतच्या संस्थांसाठी दोन शिक्षक असतील. त्यानंतर प्रत्येक १५० वदि्यार्थ्यांसाठी एक शिक्षक नियुक्त करता येईल. बीएड, एमएड अर्हता प्राप्त केलेल्या शिक्षकांची निवड केली जाईल. जुलै ते ३१ मार्च या कालावधीसाठी शिक्षकांची नियुक्ती असेल. अशोभनीय वर्तन अथवा सतत गैरहजर राहणा-या शिक्षकांवर जिल्हाधिका-यांच्या मान्यतेने शिक्षणाधिकारी नियुक्ती रद्द करू शकतील.