आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीएचआर पतसंस्थेच्या स्थावर मालमत्तांची ई-निवेदेतून विक्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आर्थिक गैरव्यवहारांमुळे अडचणीत आलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या मालकीची घरे, प्लॉट, दुकाने यासह स्थावर मालमत्ता अवसायक जितेंद्र कंडारे यांनी ई-निविदा प्रक्रियेद्वारे विक्री काढल्या आहेत. या विक्री प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात पतसंस्थेच्या ३४ हजार ८४२ वस्तूंची विक्री करण्यात येणार आहे. याबाबतची सूचना शनिवारी करण्यात येऊन बीएचआरच्या संकेतस्थळावर मालमत्तेचा तपशील देण्यात आला आहे.
बीएचआर पतसंस्था अडचणीत आल्याने राज्यभरातील २८ हजारांवर ठेवीदारांना आर्थिक फटका बसला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून या पतसंस्थेवर सहकार विभागाने अवसायक बसवला असून जितेंद्र कंडारे हे अवसायक म्हणून कारभार पाहत आहेत. मात्र, ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदार बीएचआरच्या जळगाव येथील मुख्यालयात रोजी उंबरठे झिजवत आहेत. यासाठी अवसायक उपनिबंधक याबाबत कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही. त्याचप्रमाणे या पतसंस्थेवर नियुक्त केलेला लवादक स्वत: एका संस्थेच्या विरोधातील गुन्ह्यात आरोपी असताना त्यांच्याकडून लवादाचे काम करणे म्हणजे संशयास्पद व्यवहाराला वाव देणे आहे. याबाबत २८ जून रोजी ठेवीदारांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने अवसायकांनी बीएचआरच्या मालमत्तांच्या विक्री प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

राज्यभरातील मालमत्तांचीही विक्री करा
अमळनेर, जळगाव, जामनेर, अकोल, बुलडाणा आदी राज्यभरातील विविध ठिकाणी असलेली संस्थेची स्थावर जंगम मालमत्तेचा लिलाव करण्याची मागणीही जनसंग्राम ठेवीदार संघटनेने केली आहे.

६३ लाख हजार रुपयांच्या वस्तूंची विक्री
बीएचआरच्या ६३ लाख हजार रुपये किमतीच्या ३४ हजार ८४२ वस्तूंच्या विक्रीसाठी संकेतस्थळावर ई-निविदा मागवण्यात आली आहे. त्यामध्ये दुचाकी, रिक्षाहूड, जनरेटर, नोटा माेजण्याच्या मशीन, संगणक, फॅक्स मशीन, ए.सी. स्कॅनर, सीसीटीव्ही डीव्हीआर आदी वस्तूंचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...