आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North Maharashtra University Dr Praful Patil Selection Issue Jalgaon

परभणीच्या ‘राष्ट्रवादी’ डॉक्टरांसाठी उमविच्या कुलगुरूंची शिफारस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - मराठवाड्यातील परभणीच्या एका ‘राष्ट्रवादी’ डॉक्टरचा रहिवास जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचा दाखवून त्यांची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट) नियुक्ती करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे विद्यापीठ आणि कुलगुरूंच्या कामातील राजकीय हस्तक्षेपही स्पष्ट झाला आहे.
नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य म्हणून प्रतिनिधी पाठवावे, असे आवाहन राज्यातील सर्वच विद्यापीठांना करण्यात आले होते. त्यासाठी 10 वर्षांचा वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव असणे आवश्यक होते. विद्यापीठांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनुभवी डॉक्टरची शिफारस करावी अशी अपेक्षा असताना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांनी चक्क परभणी येथील डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांच्या नावाची शिफारस केली आणि त्यानुसार त्यांच्या सदस्यत्वाचे नोटिफिकेशनही जारी झाले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आमदारकीसाठी 2004 मध्ये उमेदवारी मागणारे डॉक्टर प्रफुल्ल पाटील मागच्या पंचवार्षिक मध्ये राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य होते. आता त्यांनी या सदस्यत्वासाठी चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथील रहिवास दाखवला आहे. त्या कथित पुराव्यामुळे ते जळगाव जिल्हय़ाचे रहिवासी झाल्याचे दिसत असून त्याचाच आधार कुलगुरू मेर्शाम यांनी या शिफारशीसाठी घेतला आहे.

कुलगुरूंना अधिकार : आपल्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातून कोणाला सिनेटवर पाठवायचे याचे अधिकार पूर्णपणे संबधित विद्यापीठांच्या कुलगुरूंना असतात. फक्त डॉक्टरांची 10 वर्षांची प्रॅक्टीस झालेली असावी, अशी अट आहे, अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आदिनाथ सूर्यकल यांनी दिली.

मीच नाही सांगितले
मला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून विचारणा झाली होती. मात्र, या सर्व नियुक्तया राजकीय असतात याची आपल्याला कल्पना असल्यामुळे आपण विद्यापीठाला नकार कळविला होता. वेळेअभावी आपण त्या पदाला न्याय देऊ शकणार नाही, असे वाटल्यामुळे नकार दिला होता. विद्यापीठाच्या अटी पूर्ण न करण्याचा प्रश्नच येत नाही. आपण सर्वच अटींमध्ये बसतो. डॉ. प्रताप जाधव, जळगाव

कोण आहेत डॉ.प्रफुल्ल पाटील ?
परभणी जिल्ह्यातील उमरखेड तालुक्याचे माजी आमदार डॉ.अनंतराव देवसरकर यांचे जावई
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेश चिटणीस
सरस्वती धन्वतरी दंत महाविद्यालय, नर्सिंग स्कूलचे प्रमुख
पत्नी डॉ. विद्या पाटील राष्ट्रवादीच्या महिला सरचिटणीस
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी जवळचे संबंध
मागील वेळी राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य होते.

परभणीचे आहेत हे माहित नाही
डॉ. प्रफुल्ल पाटील यांच्या नावाची शिफारस आपणच केली आहे. ते चाळीसगाव येथील रहिवासी असल्याचे आपल्याला सांगण्यात आले. ते परभणीचे आहेत का, याची आपल्याला कल्पना नाही. आधी आपण जळगावचेच डॉ. प्रताप जाधव यांच्या नावाची शिफारस करणार होतो; पण या पदासाठी आवश्यक असलेल्या अटींपैकी शोध निबंधाची अट ते पूर्ण करीत नव्हते. त्यामुळे डॉ. पाटील यांची शिफारस केली. - डॉ. सुधीर मेश्राम, कुलगुरू, उमवि, जळगाव