आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमवि प्राधिकरण निवडणूक; 95% मतदान, उद्या मतमाेजणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण निवडणुकीत रविवारी सरासरी ९५ टक्के मतदान झाले. मंगळवारी सकाळी १० वाजता विद्यापीठ परिसरातील कर्मचारी भवनात मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. 

विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद आणि अभ्यास मंडळासाठी ही निवडणूक झाली. यामध्ये विद्यापीठ शिक्षकांमधून अधिसभेवर एक, महाविद्यालयीन शिक्षकांमधून अधिसभेवर १०, व्यवस्थापन प्रतिनिधींमधून अधिसभेवर चार अशा एकूण १५ अधिसभेच्या जागा निवडून दिल्या जाणार आहेत. तर विद्या परिषदेसाठी तीन जागा निवडून दिल्या जाणार आहेत. तसेच अभ्यास मंडळांच्या १० जागांसाठी देखील निवडणूक झाली. एकूण हजार ७२९ मतदार नोंदणी झाली होती. रविवारी झालेल्या निवडणुकीत अधिसभेसाठी हजार ६४८ मतदारांपैकी हजार ४३४ मतदारांनी (९१.९२ टक्के) मतदान केले. विद्या परिषदेसाठी देखील हजार ६४८ मतदारांपैकी हजार ४३४ मतदारांनी (९१.९२ टक्के) मतदान केले. व्यवस्थापन प्रतिनिधींच्या ८८ मतदारांपैकी ८६ जणांनी (९७.७३ टक्के) मतदान केले. अभ्यास मंडळाच्या ३४७ पैकी ३९९ मतदारांनी (९७.६९ टक्के) मतदान केले. 

जळगाव, धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यांत १९ मतदान केंद्रांवर ३३ बूथवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी प्रथमच २१ प्रकारच्या मतपत्रिका होत्या. कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील हे विद्यापीठात दिवसभर थांबून होते वेळोवेळी मतदानाचा आढावा घेत होते. प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. ए. बी. चौधरी यांनी धुळे, सोनगीर, अमळनेर, एरंडोल तसेच जळगाव शहरातील मू.जे.महाविद्यालय आणि विद्यापीठ येथील मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदानाचा आढावा घेतला. 

आजी-माजींनी केले मतदान 
किसानविद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार सतीश पाटील तापी परिसर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिरीष चौधरी, श्रम साधन मुंबई ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी मू.जे.महाविद्यालयातील केेंद्रावर मतदान केले. 
बातम्या आणखी आहेत...