आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • North Maharashtra University Enginnering Student Result Issue Jalgaon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीजीपीए पद्धत : 97 टक्के विद्यार्थी नापास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमासाठी यंदापासून सीजीपीए पद्धत सुरू केली आहे. या पद्धतीमुळे एक-एक पॉइंटच्या फरकामुळे अनेक विद्यार्थी एटीकेटी, नापास झाले असल्याचा दावा अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यासंदर्भात केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी विद्यापीठात तक्रार दाखल केली आहे.

केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या 120 विद्यार्थ्यांपैकी 6 विद्यार्थी उत्तीर्ण, 36 एटीकेटी, तर उर्वरीत सर्व विद्यार्थी नापास (97 टक्के) झाले आहेत. इतर अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचीही अशीच परिस्थिती आहे. या विद्यार्थ्यांनी निवेदनातून कॅरिऑनची मागणी केली आहे. शिवाय यंदा महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांची लेजरशीट येण्याआधीच फोटो कॉपीसाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे, त्यामुळे देखील विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्या.

फोटो कॉपीच्या विषयात वाढ व्हावी
विद्यार्थी एका वर्गाचे कितीही विषय नापास असला तरी त्याला केवळ दोन विषयांची फोटो कॉपी मिळते. अनेक वेळा विद्यार्थी दोन पेक्षा जास्त विषय नापास असतात, त्यावेळी ते ज्या दोन विषयांच्या फोटो कॉपी मागवतात ते विषय नंतर पुनर्तपासणीत पास झालेले असतात. अशा वेळी इतर विषयांची फोटो कॉपी मिळत नाही परिणामी विद्यार्थ्यांवर अन्याय होतो.

पुरवणी परीक्षा घेण्याची मागणी
जळगावसह धुळे, नंदुरबार येथील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनाही अशाच प्रकारच्या निकालाचा धक्का बसला. त्यामुळे पहिल्या वर्षाची पुरवणी परीक्षा घ्यावी, या मागणीचे निवेदन शुक्रवारी सिनेट सदस्य अँड. अमित दुसाने आणि नितीन ठाकूर यांनी दिले.

सर्व विषयांच्या फोटोकॉपी द्या
सीजीपीए पद्धतीच्या निकालामुळे अनेक विद्यार्थी एक-एक पॉइंटमुळे काही विषय नापास झाले आहेत. या वर्षी नवीन अभ्यासक्रम असल्यामुळे विद्यार्थ्यांना आधीच त्रास सहन करावा लागला. करिश्मा फालक, विद्यार्थिनी

एकाच वेळी एवढे विद्यार्थी नापास झाल्या मागचे कारण विद्यापीठाने शोधले पाहिजे. विद्यार्थ्यांना सर्व विषयांच्या फोटो कॉपी दिल्या तर सर्व प्रकार उघडकीस येईल. कुणाल सोनार, विद्यार्थी

तक्रारी आहेत
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची तक्रार आली आहे. नियमानुसार नापास किंवा एटीकेटी मिळालेले विद्यार्थी न्याय मिळविण्यासाठी दोन विषयांची फोटोकॉपी मागवून निकालाला आव्हान देऊ शकतात. लेजरशीट नसली तरी विद्यार्थ्यांनी मार्कशीटच्या झेरॉक्स प्रतीच्या आधारे फोटोकॉपी मागवण्याची सवलत देण्यात आली आहे. - डॉ.ए.यू.बोरसे, प्रभारी परीक्षा नियंत्रक, उमवि


सीजीपीए पद्धतीच्या गुणपत्रकात 32 पॉइंट म्हणजे काय? ते समजावले नाही
ज्या विद्यार्थ्यांचे निकाल एटीकेटी आहेत त्यांच्या सीजीपीए पद्धतीच्या गुणपत्रकात 32 पॉइंट म्हणजे काय? ते विद्यार्थ्यांना समजावले नाही.

एकाच वेळी एवढय़ा जास्त प्रमाणात विद्यार्थी नापास झाले असल्यामुळे संपूर्ण निकाल एकावेळी तपासणी करण्यात यावा.

या वर्षी 60:40 लागू केला आहे. त्यामुळे आतापर्यंत आमचे एक वर्ष 80:20 आणि इतर वर्षे 60:40 प्रमाणे होतील, ही तफावत विद्यापीठाने लक्षात घेतली नाही.

अभ्यासक्रम नवीन असल्यामुळे या वर्षी सीजीपीए लागू करणे योग्य नव्हते, उत्तरपत्रिका योग्यपद्धतीने तपासल्या गेलेल्या नाहीत.