आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या वर्षी प्रवेशक्षमता वाढीकडे उमविचे दुर्लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने कला, वाणिज्य विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेश क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले नाही. परिणामी खान्देशातील विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशमंत्री अॅड. विवेकानंद उजळंबकर यांनी शनिवारी जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
शासनाने सुरुवातीला प्रथम वर्षासाठी २० टक्के वाढीव प्रवेशांची सूट यंदा बंद केली. त्यानंतर आता मात्र पुन्हा सूट दिली आहे. राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये वाढीव प्रवेश देणे सुरू झाले आहे. खान्देशात मात्र अद्याप अनेक विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. जागांची टंचाई दाखवून विद्यार्थ्यांकडून आर्थिक लूट करण्याचा घाट घातला जात आहे. विद्यार्थ्यांचे आर्थिक शैक्षणिक नुकसान होण्याची वेळ आलेली असताना अजूनही उमविने शासनाशी पत्रव्यवहार केलेला नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, असे चित्र निर्माण झाले आहे. यंदा बारावीचा निकाल चांगला लागला आहे. त्यानंतर जुलै रोजी शिक्षणमंत्र्यांसोबत सर्व विद्यापीठांच्या प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीतही जागा वाढवण्याचा प्रस्ताव उमविने सादर केला नाही, असे आरोप उजळंबकर यांनी केले. तसेच विद्यापीठाने जागा वाढवल्या नाहीत तर अभाविपतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही दिला आहे.

खुल्या निवडणुका याच वर्षी व्हाव्या
राज्यशासनाने महाविद्यालयांमध्ये खुल्या निवडणुका घेण्याचे जाहीर केले आहे. मात्र, त्याची प्रत्यक्ष कृती होत नाही. आता विद्यापीठाचा नवीन कायदा लागू झाल्यानंतर निवडणुका होतील, अशी चर्चा पसरवली जात आहे. मात्र, तसे करता चालू वर्षीच निवडणुका व्हाव्यात, त्यामुळे महाविद्यालयांची मनमानी थांबेल, अशी अभाविपची भूमिका आहे. सिनेट निवडणुकांसाठी तूर्त खर्च करता नवीन कायदा लागू झाल्यावरच सिनेटच्या निवडणुका घ्याव्यात. नवीन कायदा सर्वसमावेशक असावा, यासाठी अभाविप विविध पातळ्यांवर चर्चासत्र घेणार आहे, असेही उजळंबकर यांनी सांगितले.

महाविद्यालयांवर कारवाई नाही
उत्तरमहाराष्ट्र विद्यापीठाने प्रथम वर्षासाठी १० तर द्वितीय वर्षासाठी २० टक्के जागांची सूट दिली. ही सूट कमी आहे. तसेच या वाढीव जागांवर प्रवेश देण्यासाठी प्रती विद्यार्थी ३०० रुपयांप्रमाणे महाविद्यालयांना दंड भरावा लागणार आहे. अनेक महाविद्यालये हा दंड विद्यार्थ्यांकडून वसूल करीत आहेत. यासंदर्भात चोपडा येथील विद्यार्थ्यांनी लेखी तक्रार विद्यापीठाकडे केली आहे. मात्र, तरीही विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयावर कारवाई केली नाही. यातून विद्यापीठ हे महाविद्यालयांच्याच बाजूने असून त्यांना विद्यार्थ्यांशी काही एक देणे-घेणे नसल्याचे दिसून येते आहे, असेही उजळंबकर यांनी सांगितले.

अभाविपची सदस्य नोंदणी अभियान सुरू झाले आहे. यंदा नोंदणी फी ऐवजी रुपये करण्यात आली आहे. तसेच आता नोंदणीकृत सदस्यांना एसएमएसच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरातील माहिती त्यांना देण्यात येईल. महाविद्यालयांत प्रवेश घेऊनही खेड्यापाड्यावरील विद्यार्थी नियमित महाविद्यालयात जाऊ शकत नाहीत. त्यांची माहिती गोळा करून त्यांच्यासाठी योग्य मदत करण्याचा प्रयत्न आगामी काळात अभाविप करणार आहे.
बातम्या आणखी आहेत...