आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • North Maharashtra University Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लघुउद्योगांसंदर्भात ‘रोड मॅप’ मंत्रालयाकडे सादर करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पदवीपदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगा. तसेच बाजारपेठेची मागणी आणि कल लक्षात घेऊन उद्योजक व्हा. उद्योगासाठी ज्ञान, प्रामाणिकपणा, एकाग्रता आणि तंत्रज्ञानाच्या माहितीची गरज असते अशा अनेक टिप्स सोमवारी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय परिषदेत मान्यवरांनी विद्यार्थ्यांना दिल्या.
‘शिक्षण उद्योजकता’ या विषयावर ही परिषद झाली. या वेळी लघुउद्योगांसंदर्भात उमविकडून प्राप्त झालेला रोड मॅप केंद्रीय मंत्रालयाकडे सादर केला जाणार असल्याची ग्वाही सीएमएआयच्या वतीने देण्यात आली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि सीएमएआयतर्फे ही परिषद घेण्यात अाली. सीएमएआयचे अध्यक्ष प्रा.एन.के.गोयल, कुलगुरू प्रा.सुधीर मेश्राम, जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक माहिती खात्याचे वैज्ञानिक मुकुल यादव, राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाचे कृष्णा मोहन यांनी मार्गदर्शन केले.
विद्यापीठाच्या उद्योजक आंतरसंवाद कक्षाच्या मुख्य समन्वयिका डॉ.प्रीती अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. या वेळी जिल्ह्यातील लघुउद्योगांसंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. पूजा शर्मा यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ.अनिल डोंगरे यांनी आभार मानले. परिषदेला बीसीयूडीचे संचालक प्रा.डॉ.डी.जी.हुंडीवाले, कुलसचिव प्रा.ए.एम.महाजन अदी उपस्थित होते. उमवि सीएमएआयतर्फे झालेल्यापरिषदेत बोलताना प्रा. एन. के. गोयल.
विद्यार्थ्यांना मदत करणार
प्रा.गोयलम्हणाले की, लाखो विद्यार्थी दरवर्षी पदवी घेऊन महाविद्यालयांतून बाहेर पडतात. त्यांच्यात उद्योजकतेची आवड निर्माण व्हावी यासाठी सीएमएआयतर्फे देशभरात प्रयत्न सुरू आहेत. तंत्रज्ञान आणि शिक्षणाचे बदलते जग, गतिशीलता , सोशल नेटवर्किंग, उत्पादकता याविषयीही त्यांनी माहिती दिली. तसेच उमवि आणि सीएमएआयमध्ये सामंजस्य करार केला जाणार असून, त्यातून उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
धोका पत्करावा
अतुलजैन म्हणाले की, उद्योजकता ही आता कुणाची मक्तेदारी राहिलेली नाही. विविध विद्याशाखांमधील विद्यार्थीही उद्योगाकडे वळू शकतात. मात्र, जीवनात संघर्ष अटळ आहे. त्यामुळे उद्योग सुरू करताना धोकाही पत्करावा लागतो. प्रत्येकाने त्याची तयारी ठेवावी, असा सल्ला त्यांनी दिला. मुकुल यादव यांनी केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक विभागाच्या योजनांची माहिती देऊन या उद्योगातील विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.