आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी कुलगुरू पाच वर्षांनंतर उमवित, गत पाच वर्षांच्या कार्यकाळाबाबत अनेकांनी व्यक्त केली नाराजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा.पी.पी.पाटील हे बुधवारी विराजमान झाले. त्यांच्या स्वागत कार्यक्रमाप्रसंगी उमविचे पहिले कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे चवथे कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांची विशेष उपस्थिती होती. डॉ. ठाकरे डॉ.पाटील हे दोघे सुमारे पाच वर्षांच्या कालखंडानंतर बुधवारी पहिल्यांदाच विद्यापीठात आले. स्वागत कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी गत पाच वर्षांच्या कालखंडाबाबत मनोगतातून नाराजी व्यक्त केली आहे.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात काम करणाऱ्या प्राध्यापकाला पहिल्यांदाच कुलगुरुपदाची संधी यंदा मिळाली आहे. माजी कुलगुरू डॉ.सुधीर मेश्राम यांच्या कार्यकाळात त्यांच्या अाधीचे एकही माजी कुलगुरू कोणत्याही कार्यक्रमांना उपस्थित नव्हते. याबाबत माध्यमांनी अनेकवेळा वृत्तांकन केले. दरम्यान गत पाच वर्षांत विद्यापीठातील कोणत्याही कार्यक्रमांना माजी कुलगुरूंना बोलावण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, बुधवारी प्रा. डॉ.पी.पी. पाटील यांच्या कुलगुरुपदाच्या कार्यक्रमास दोन माजी कुलगुरूंनी येणे ही बाब लक्षणीय ठरली. प्रा.पाटील यांनी आत्तापर्यंतच्या पाचही कुलगुरूंसोबत काम केले आहे. त्यामुळे आजी-माजी कर्मचारी, अधिकारी सर्वांनाच आनंद झाल्याचे दिसून येत आहे. तर स्वागत कार्यक्रमात काहींच्या भाषणातून मात्र गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या नकारात्मक बाबींचा उल्लेखही करण्यात आला. डॉ.के.बी.पाटील, माजी सिनेट सदस्य दिलीप पाटील यांनी याबाबतीत आपल्या भावनाही व्यक्त केल्या. अप्रत्यक्षपणे मागील पाच वर्षांच्या काळातील काही घटनांवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

फिटेअंधाराचे जाळे... झाले मोकळे आकाश
डॉ.पी.पी.पाटीलयांच्या रुपाने संशोधन वृत्ती असलेले अभ्यासू व्यक्तिमत्त्व लाभले आहे. 'फिटे अंधाराचे जाळे... झाले मोकळे आकाश,' असे सांगून आज खऱ्या अर्थाने विद्यापीठात दिवाळीच्या प्रकाशपर्वास सुरुवात झाली आहे. ही दिवाळी ४-५ दिवसांची नसून आगामी पाच वर्षांची असल्याचे डॉ.पी.पी. माहुलीकर यांनी मनोगतातून व्यक्त केले. तसेच विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ.एन.के. ठाकरे यांनी रत्नाची खाण घडवली असल्याने आगामी काळात इतर विद्यापीठांमध्ये आपल्या विद्यापीठातील प्राध्यापक कुलगुरू पदावर कार्यरत दिसून येतील, असा आशावाददेखील व्यक्त केला.
आता जाती-पातीचे राजकारण नको
दिलीप रामू पाटील यांनीही राग व्यक्त केला. कान भरणाऱ्यांच्या माथी काठी मारण्याची वेळ आली आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्व समाजाला पुढे नेऊन काम करायचे आहे. काही प्राध्यापकांनी जातीपातीचे राजकारण करीत फूट पाडण्याचे प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले. उमवितील ११ प्राध्यापक कुलगुरुपदाच्या शर्यतीत अाल्याचा आनंद व्यक्त केला.
वाईटाला वाईट म्हणण्याचे धाडस करा

चांगल्यांनाचांगले म्हणण्याची दानत आपल्यात आहे. पण वाईटाला वाईट म्हणण्याची ताकद आपल्यात नाही. कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेत यंदा सर्वात जास्त उत्सुकता होती. आपल्यातीलच व्यक्ती कुलगुरू झाला याचा आनंद आहे. ही विद्यापीठाची फलश्रुती आहे असे डाॅ. एन. के. ठाकरे यांनी भाषणात सांगितले.
बातम्या आणखी आहेत...