आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North Maharashtra University News In Marathi, Examination Schedule, Divya Marathi

उत्तर महाराष्‍ट्र विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये बदल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - लोकसभा निवडणुकीमुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये बदल करण्यात आला आहे. 23, 24 आणि 25 एप्रिल रोजी होणार्‍या विविध शाखांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा शेवटच्या टप्प्यात घेण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या नियोजन वेळापत्रकानुसार 28 मार्चपासून शाखानिहाय परीक्षांना सुरुवात होणार आहे. अभियांत्रिकीच्या परीक्षा लक्षात घेऊन 10 जूनपर्यंत परीक्षा चालेल. लोकसभेसाठी 24 एप्रिल रोजी उत्तर महाराष्ट्रात मतदान होणार आहे. निवडणुकीचा आधीचा व नंतरचा दिवस लक्षात घेऊन तीन दिवसांच्या परीक्षांचे वेळापत्रकात बदल झाला. यात कला, फार्मसी, अभियांत्रिकीसह अन्य 30 शाखांच्या परीक्षांमध्ये बदल झाला, असे उपकुलसचिव डॉ. राजेश वळवी यांनी सांगितले.