आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North Maharashtra University News In Marathi , Nita Kolpe, Civil, Divya Marathi, Jalgaon

विद्यापीठाच्या लवचिकतेमुळे तिचं आयुष्य आलं रुळावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने कायद्यावर बोट ठेवत विशेष पत्र द्यायचं नाकारलं असतं तर एका प्लंबरची मुलगी आज सहायक अभियंतासारख्या शासकीय पदावर निवडली गेली नसती. ‘कायदा विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी की विद्यार्थी कायद्याच्या अस्तित्वासाठी? या मूलभूत प्रश्‍नाचं हे जीवंत उदाहरण असून अन्य संस्था आणि त्यांच्या प्रमुखांनी त्यापासून सकारात्मक धडा घेण्याची आवश्यकता समोर आली आहे.


नीता शंकर कोळपे ही विद्यार्थिनी स्थापत्य (सिव्हील)अभियांत्रिकीची पदवी परीक्षा विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. मात्र, तृतीय वर्षाच्या एनएमसी (न्युमरीकल मेथड ऑफ सिव्हिल) या विषयात तिला उत्तीर्ण होण्यासाठी एक गुण कमी पडला. तिने उत्तरपत्रिका पुनर्तपासणीचा अर्ज केला आणि त्यासाठी दीड महिन्याचा अवधी लागला. त्यानंतर तिला नव्याने गुणपत्रक मिळाले. मधल्या काळात तिने सहायक अभियंता पदासाठीची राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीला तिला गुणपत्रकाची मागणी करण्यात आली.


विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार गुणपत्रकावर जी तारीख असायला हवी होती त्यापेक्षा उशीराची तारीख दिसत असल्याने त्याच्या खरेपणाबद्दल प्रश्‍न उपस्थित झाला. त्याची सत्यता सिद्ध करण्याचे तिला सांगण्यात आले. त्यासाठी आठ दिवसांचा अवधी देण्यात आला. मात्र, उत्तरपत्रिका पुनर्मुल्यांकनात दीड महिना गेला हे सांगणारे पत्र देण्याची तरतूद विद्यापीठाकडे नव्हती. त्यामुळे आधी तिला असे पत्र देण्यास विद्यापीठातील काही अधिकार्‍यांनी नकार दिला. मात्र, कुलगुरू सुधीर मेश्राम यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचल्यावर नीताला तसे पत्र तातडीने देण्याची व्यवस्था विद्यापीठाने केली. त्यामुळे लोकसेवा आयोगाने गुणपत्रक ग्राहय़ धरून तिची सहायक अभियंता पदासाठी निवड जाहीर केली आहे. आचारसंहिता संपल्यावर तिला जलसिंचन खात्यात नियुक्ती मिळणार आहे.यासाठी तिला विद्यापीठातील जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील, सहायक कुलसचिव ज्ञानदेव नीलवर्ण, बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संजय शेखावत यांचे सहकार्य मिळाले, असे ती सांगते.


पुढे वाचा नीताच्या वडीलांविषयी...