आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमविच्या संशोधन प्रकल्प स्पर्धेत 42 विद्यार्थ्यांचा सहभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागामार्फत पदवी-पदव्युत्तर नियमित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन प्रकल्प सादरीकरण स्पर्धा धनाजी नाना चाैधरी समाजकार्य महाविद्यालयात बुधवारी पार पडली. यात विविध विद्याशाखेतील ४२ विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण केले. 
 
कार्यक्रमाचे उद्घाटन बीसीयूडीचे संचालक प्रा.डाॅ. पी.पी.माहुलीकर यांच्या हस्ते करण्यात अाले. या वेळी व्यवस्थापनशास्त्र प्रशाळाचे सदस्य प्रा.अतुल बारेकर, विद्यार्थी कल्याण विभाग संचालक प्रा.सत्यजित साळवे, मूजे महाविद्यालयाचे प्रा.डाॅ. केतन नारखेडे, धनाजी नाना विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. राजेंद्र वाघुळदे उपस्थित हाेते. पी.पी.माहुलीकर यांनी शोध आविष्कार यातील फरक समजावून सांगितला. 
 
प्राचार्य डॉ.उमेश वाणी यांनी विज्ञानातील संशोधनासोबतच सामाजिक संशोधनाकडे लक्ष वेधले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे होणारी प्रगती निश्चितच समाजासाठी उपयोगी असली तरी अजूनही कुपोषण, दारिद्रय, पिण्याच्या पाण्याचा अभाव आणि शेतकरी आत्महत्या यासारखे गंभीर विषय आपल्या समोर आहेत. या समस्यावर संशोधनाव्दारे उपाय होऊ शकतो, असे प्रतिपादन केले. डॉ.कल्पना भारंबे यांनी सूत्रसंचालन तर प्रा.अशोक हनवते यांनी आभार मानले. 
 
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे 
विज्ञान, अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र गट : प्रथम- सकिना आर. पिंजारी (बेंडाळे महिला महाविद्यालय), द्वितीय- आशिष जगतसिंग पाटील (फार्मसी कॉलेज) आणि दीपक प्रकाश गोसावी. तृतीय- डिगंबर रवींद्र वारके. कला वाणिज्य गट : प्रथम- वैशाली रमेश महाले (समाजकार्य महाविद्यालय), द्वितीय- दीपा विजय अग्रवाल, तृतीय- गीता रमेश महाजन (बेंडाळे महाविद्यालय). विधी गट: प्रथम-विनिता हेमंत बाहेती 
बातम्या आणखी आहेत...