आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North Maharashtra University Professor Found New Technology

..तर दूरचित्रवाणी संच होतील आणखी स्वस्त !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉ.पद्माकर चव्हाण यांच्या संशोधनातून इलेक्ट्रॉन्सच्या प्रभावी उत्सर्जनाचे अतिसूक्ष्म पदार्थ सापडले, तर ‘एफईडी’ तंत्रज्ञानाला नवी झळाळी येणार आहे. त्यामुळे टीव्ही संच आणि मॉनिटरसारख्या वस्तू आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे.

प्रा. डॉ.चव्हाण यांना या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने 40 लाख 94 हजार 800 रुपयांचे विशेष अनुदान मंजूर केले आहे. ‘नॅनो मटेरियलपासून होणारे इलेक्ट्रॉन उत्सर्जन’ असे या प्रकल्पाचे नाव असून, चार वर्षांत तो पूर्ण करायचा आहे.

एका विद्यार्थ्याला अभ्यासवृत्ती
या प्रकल्पासाठी डॉ.चव्हाण यांच्या मदतीला एक संशोधक विद्यार्थी दिला जाणार आहे. या संशोधक विद्यार्थ्याला मंजूर झालेल्या रकमेतून 18 हजार रुपये महिना अभ्यासवृत्ती मिळेल, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

एलसीडीपूर्वीचे तंत्र
एलसीडी (लिक्वीड क्रिस्टल डिस्प्ले) तंत्राचे टीव्ही आणि मॉनिटर बाजारात येण्यापूर्वी मोटोरोला कंपनीने ‘एफईडी’ (फिल्ड इमिशन डिस्प्ले) तंत्राचे टीव्ही संच बाजारात आणले होते; मात्र त्यात इलेक्ट्रॉन्सचे उत्सर्जन अनिश्चित होते. त्यामुळे त्या तंत्राचे ‘डिस्प्ले डिव्हाइस’ फार काळ चालत नसत आणि त्यात वारंवार बिघाड होत होता. डॉ.चव्हाण यांच्या संशोधनात इलेक्ट्रॉन्सच्या प्रभावी उत्सर्जनाचे अतिसूक्ष्म पदार्थ सापडले, तर ‘एफईडी’ तंत्रज्ञानाला नवी झळाळी येईल.