आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North Maharashtra University Students Got Two Awards In Japan

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी जपानमध्ये पटकावले दोन पारिताेषिके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जपान येथील तोकुशिमा विद्यापीठ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांतर्गत आंतरराष्ट्रीय समर स्कूलसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे पाच विद्यार्थी जपानला जाऊन नुकतेच परतले. तेथे झालेल्या उत्कृष्ट संशोधनाच्या तोंडी सादरीकरणात दोन पारितोषिके उमविने पटकावले.

विद्यापीठ आणि जपानच्या तोकुशिमा विद्यापीठ यांच्यात दोन वर्षांपूर्वी सामंजस्य करार झाला. या करारानुसार दोन्ही विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक यांच्यात उच्च शिक्षणासंदर्भात अादान-प्रदान करण्याचा संयुक्त प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या कराराचा एक भाग म्हणून उमविचे पाच विद्यार्थी २६ जुलै ते ऑगस्ट दरम्यान तोकुशिमा विद्यापीठ येथे झालेल्या समर स्कूल ट्रेनिंग प्रोग्रामसाठी जाऊन आलेत. यामध्ये ललित चोपडे (जीवशास्त्र प्रशाळा, उमवि), अनिल गायकवाड (भौतिकशास्त्र प्रशाळा, उमवि), विलास महिरे (रासायनशास्त्र प्रशाळा, उमवि), प्रसाद फडके (आर.सी.पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूर,जि.धुळे) आणि अमेय शिरवाडकर (श्रम साधना ट्रस्टचे अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरी, जळगाव) या पाच विद्यार्थ्यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांनी मंगळवारी कुलगुरू प्रा.सुधीर मेश्राम यांची भेट घेऊन चर्चा केली.

या समर स्कूलमध्ये १८ देशांतील ४८ संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते. नॅनो टेक्नाॅलॉजी अॅण्ड मटेरियल सायन्स विषयाच्या तोंडी सादरीकरणात ललित चोपडे, विलास महिरे अमेय शिरवाडकर यांना तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या तोंडी सादरीकरणात अमेय शिरवाडकर यास उत्कृष्ट सादरीकरणाचे पारितोषिक मिळाले. या विद्यार्थ्यांनी हिरोशिमा, ओत्सुका, फार्मा, क्योतो, कामिकात्सू, मियाजिमा येथे भेटी दिल्या. कामिकात्सू येथे कचऱ्याच्या व्यवस्थापनाबद्दल सुरू असलेल्या विविध प्रयोगांची माहिती या विद्यार्थ्यांना भेटीत मिळाली.